काउंटडाउन होताच नाटू-नाटू गाण्यावर थिरकले WWEचे सुपरस्टार्स, पाहा Viral Video

WWE Superstars Dance On Naatu Naatu: नाटू नाटू गाण्यावर WWE सुपरस्टार थिरकले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 18, 2023, 08:30 AM IST
काउंटडाउन होताच नाटू-नाटू गाण्यावर थिरकले WWEचे सुपरस्टार्स, पाहा Viral Video title=
WWE Superstars dance to RRRs Naatu Naatu song in the ring watch viral video

WWE Superstars Dance On Naatu Naatu: वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चा हैदराबादमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर WWEच्या सुपरस्टार्सनी एकच जल्लोष केला. यावेळी साऊथच्या RRRया हिट चित्रपटातील नाटू नाटू गाण्यावर ताल धरला. WWEच्या सुपरस्टार्सचा हा भन्नाट डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनाही हा व्हिडिओ चांगलाच आवडला आहे. या व्हिडिओत डब्लूडब्लूईचे रेसलर्स RRR चित्रपटातील सुपरहिट गाण्यावर एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून छान डान्स करताना दिसत आहेत. 

 WWEच्या विंगमध्ये नेहमीच गंभीर वातावरण असते. प्रेक्षकांना नेहमीच अॅक्शन आणि थरार पाहायला मिळतो. मात्र, यावेळी WWEच्या विंग वेगळाच नजारा पाहायला मिळाला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत ड्य्रू मॅकइंटायर, जिंदर महल, सामी जैन आणि केविन ओवेन्ससारखे सुपस्टार दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर epicwrestlingmoments  नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला काउंटडाउन देण्यात येत आहे. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला सगळेच नाटू नाटू गाण्यावर थिरकायला लागतात. 

या व्हिडिओला आत्तापर्यंत 6 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओला खूप लाइक्सही मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंटकरुन आवडलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने म्हटलं आहे की, आधी WWEमध्ये रक्त, अॅक्शन, डोक्यावर खुर्च्या तोडणे, जिंवत गाडणे, अद्भूत स्क्रिप्ट आणि आता नाटू नाटू. तर, दुसऱ्या युजर्सने म्हटलं आहे की, हीच भारताची खरी ताकद आहे. त्यांनी नाटू नाटूच्या ऐवजी नाचो नाचो प्ले केले आहे. तर, चौथ्या युजरने म्हटलं आहे की, हीच भारतीय सिनेमाची खरी ताकद आहे. 

दरम्यान, ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्या RRR चित्रपटातील नाटू नाटू गाणे असूनण विशाल मिश्रा आणि राहुल सिप्लिगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. रिया मुखर्जी हिने या गाण्याचे बोल लिहले आहेत. या गाण्याची खासियत म्हणजे, हे गाणं रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याच्या काही महिन्याआधी राजधानी किव येथील मरियिंस्की पॅलेस (युक्रेन राष्ट्रपती महल) येथे चित्रित करण्यात आले होते. एस एस राजमौली हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर, या गाण्याला बेस्ट सॉंगचा ऑस्कर पुरस्कारदेखील मिळाला आहे. तामिळमध्ये या गाण्याचे नाव नाट्टू कुथू, कन्नडमध्ये हल्ली नातू आणि मल्याळम करिन्थोल या नावाने रिलीज करण्यात आले आहे.