Wrestlers Protest: भारतीय कुस्ती संघाचे (WFI) प्रमुख बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू हरिद्वारमध्ये (Haridwar) गंगेच्या (Ganga) किनारी दाखल झाले आहेत. कुस्तीगिरांनी आपली पदकं गंगेत फेकून देण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन करणाऱ्या विनेश फोगाट (Vinesh Phogat), साक्षी मलिक (Sakshi Malik), बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांनी ट्वीट करत आपण आपली पदकं विसर्जित करणार असल्याचं जाहीर केलं होतं. ट्वीटरला (Twitter) कुस्तीगिरांनी पत्र शेअर करत ही माहिती दिली होती. जर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचा आवाज ऐकला नाही तर आम्ही पदकं गंगेत फेकून देऊ असा त्यांनी दिला होता.
"आम्ही मेडल गंगेत विसर्जित करणार आहोत. कारण ही गंगा जितकी पवित्र मानतो, त्याच पवित्रतेने आम्ही मेहनत करत हे मेडल्स मिळवले आहेत," अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
#WATCH | Wrestlers reach Haridwar to immerse their medals in river Ganga as a mark of protest against WFI chief and BJP MP Brij Bhushan Sharan Singh over sexual harassment allegations.#WrestlersProtest pic.twitter.com/QkPEdmbjTm
— ANI (@ANI) May 30, 2023
कुस्तीगीर पदकं विसर्जित करण्यावर ठाम असताना गंगासभा मात्र त्यांचा विरोध करणार आहे. गंगासभा हरिद्वारचे अध्यक्ष गौतम यांनी सांगितलं की, "जर कुस्तीगीरांनी पदक विसर्जित करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचा विरोध करु. हे गंगेचं क्षेत्र आहे. येथे लोक पूजा करण्यासाठी येतात. हे जंतर मंतर किंवा राजकीय आखाडा नाही. आम्ही त्यांचा सन्मान करतो. हवं तर ते सर्वजण गंगा आरतीत सहभागी होऊ शकतात".
#WATCH | Protesting Wrestlers in Haridwar to immerse their medals in river Ganga as a mark of protest against WFI chief and BJP MP Brij Bhushan Sharan Singh over sexual harassment allegations. #WrestlersProtest pic.twitter.com/4kL7VKDLkB
— ANI (@ANI) May 30, 2023
"पदक आमचा जीव, आत्मा आहे. हे पदक गंगेत विसर्जित केल्यानंतर आमच्या जगण्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसणार आहोत. इंडिया गेट आपल्या त्या शहिदांची जागा आहे, ज्यांनी देशासाठी आपले प्राण दिले. आम्ही त्यांच्याइतके पवित्र नाही, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना आमच्या भावना त्या सैनिकांसारख्याच आहेत," असा इशारा त्यांनी दिला आहे.
मात्र दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की, "इंडिया गेटच्या जवळपास कोणत्याही प्रकारचं आंदोलन किंवा आमरण उपोषण करण्याची परवानगी दिली जाणार नाही". याआधी दिल्लीच्या डीसीपी पीआरओ सुमन नलवा यांनी सोमवारी सांगितलं होतं की, "कुस्तीविरांना आता जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर त्यांना अन्य ठिकाणी आंदोलन करायचं असेल तर परवानगी घ्यावी लागेल".