World Happiness Day : तुम्हाला 100 वर्ष जगायचंय का ? त्यासाठी फक्त इतकंच करा

उद्या जागतिक आनंद दिन आहे. आनंदी राहिल्यामुळे तुम्ही आयुष्य तर सुखात जगताच, पण आयुष्यही वाढतं... ही केवळ एक थिअरी नाहीये, तर वैज्ञानिक संशोधनातून ही बाब सिद्ध झालीये... हॅपिनेस डेनिमित्त बघुयात आनंदाचा शतायुषी फॉर्मुला...

Updated: Mar 19, 2021, 10:30 PM IST
World Happiness Day : तुम्हाला 100 वर्ष जगायचंय का ? त्यासाठी फक्त इतकंच करा title=

मुंबई : उद्या जागतिक आनंद दिन आहे. आनंदी राहिल्यामुळे तुम्ही आयुष्य तर सुखात जगताच, पण आयुष्यही वाढतं... ही केवळ एक थिअरी नाहीये, तर वैज्ञानिक संशोधनातून ही बाब सिद्ध झालीये... हॅपिनेस डेनिमित्त बघुयात आनंदाचा शतायुषी फॉर्मुला...

आनंदी राहायचं, सकारात्मक विचार करायचा

होय. हे खरं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त निरोगी आयुष्य जगायचं असेल, तर त्याचा फॉर्म्युला आता समजलाय. सकारात्मक विचार करायचा, संतुलित आहार घ्यायचा, आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत करायचा आणि आनंदी राहायचं... बस्... एवढं जरी तुम्ही केलंत, तरी शतायुषी होऊ शकाल. अमेरिकेतल्या बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिननं याबाबत संशोधन केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनात सकारात्मक विचार करणारे लोक 85 वर्षांपेक्षा जास्त जगणारे असल्याचं निष्पन्न झालं आहे.

- संशोधकांनी 69 हजार 744 महिला आणि 1 हजार 429 पुरूषांचा अभ्यासात समावेश केला होता.
- महिलांचं सलग 10 वर्षं तर पुरूषांचं 30 वर्ष निरीक्षण करण्यात आलं. 
- त्यांचं वय, शैक्षणिक पात्रता, मानसिक स्थिती, अल्कोहोल सेवनाचं प्रमाण, व्यायाम, डाएट आणि ते घेत असलेली प्राथमिक काळजी याकडे लक्ष देण्यात आलं. 
- यातून दिलखुलासपणे जीवन जगणाऱ्या व्यक्ती 15 टक्के जास्त जगतात, असं समोर आलंय. 
- सकारात्मक विचार करणाऱ्यांपैकी 70 टक्के लोक 85 वर्षांपेक्षा जास्त जगतात, असं हे संशोधन सांगतं. 

त्यामुळे तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य हवं असेल, तर भविष्याची फार चिंता करून नका... आनंदी राहा आणि मस्त जगा...