Viral Video: सेलच्या साड्यांसाठी महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

Womens Fight Video: व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, साड्यांचा सेल (Sale of Saree) लागताच खरेदी करण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली. महिला हातातील साड्या हिसकावण्याचा प्रयत्न करते, तेव्हा दुसरी महिला तिला मारताना दिसत आहे. त्यावेळी एकमेकींनी एकमेकींच्या झिंझ्या देखील उपटल्या.

Updated: Apr 24, 2023, 09:17 PM IST
Viral Video: सेलच्या साड्यांसाठी महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, तुम्ही पाहिला का व्हिडिओ? title=
Womens Fight Video bengaluru saree sale

Women Fighting Viral Video: अगंगं साड्यांचा सेल लागलाय, अशी एक कुणकुण जरी कोणा एका महिलेचा कानी पडली तर, ती बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होयला वेळ लागत नाही. थोड्यात अवधीत सेलच्या दुकानात (Saree Discount Store) गर्दी दिसू लागते. असणारच... कारण शॉपिंग (Shopping) म्हणजे बऱ्याच महिलांचा काळजाचा विषय. त्यामुळे शॉपिंगच्या बाबतीत महिलांना नेहमी प्राधान्य दिलं जातं. सध्या एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या डोक्यावर हात मारला आहे.

इंटरनेटवर व्हायरल (Trending Video) झालेल्या व्हिडिओमध्ये दुकानात सेलच्या साड्या खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांनी राडा (Womens Fight Video) घातला. सार्वजनिक नळावरची भांडणं आता जास्त पहायला मिळत नाहीत. पण ज्यांनी याचा अनुभव घेतला असेल, त्याचा भुतकाळाची प्रचिती झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ (Funny Video) पाहून तुम्ही देखील हसून हसून लोलपोट व्हाल. (Two women get into free style fight for a sale of saree at Bengaluru discount store Video goes Viral)

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, साड्यांचा सेल (Sale of Saree) लागताच खरेदी करण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली. अनेक महिलांच्या हातात साड्याचा सापडा दिसतोय. काही महिला आपल्या आवडीच्या साड्या निवडत असताना अचानक मागून दोन महिल्या आवाज करताना दिसतात. महिलांची शाब्दिक बाचाबाची सुरू होते. त्यावेळी प्रकरण शिगेला पोहोचतं आणि हाणामारी सुरू होते.

पाहा Video -

दरम्यान, हे प्रकरण बंगळुरूमधील (Bengaluru) असल्याची माहिती मिळाली आहे. महिला हातातील साड्या हिसकावण्याचा प्रयत्न करते, तेव्हा दुसरी महिला तिला मारताना दिसत आहे. त्यावेळी एकमेकींनी एकमेकींच्या झिंझ्या देखील उपटल्या. हा व्हिडीओ @rvaidya2000 ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलाय. यावर भन्नाट कमेंट्स देखील नेटकरी करत असल्याचं दिसतंय.