नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय.
गरिबीच्या ओझ्याखाली हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. पतीच्या उपचारासाठी एका मातेवर आपल्या अवघ्या १५ दिवसांच्या मुलाला विकावं लागलं. ही आई आपल्या मुलाला भेटण्यासाठी तरफडतेय परंतु, तिच्याकडे इतके पैसेही नाहीत जे देऊन तिला तिचं बाळ परत घेता येईल.
बरेलीच्या मीरगंजमध्ये राहणाऱ्या या महिलेचं नाव संजू असल्याचं सांगण्यात येतंय. घरात तिचा पती एकमेव कमावता व्यक्ती होता. मजदूरी करून तो आपलं आणि आपल्या कुटुंबाच्या दोन वेळच्या तुकड्यांची सोय करत होता. परंतु, काही दिवसांपूर्वी काम करताना एका घराची भिंत अंगावर कोसळून तो गंभीर स्वरुपात जखमी झाला. या दरम्यान त्याच्या पाठिचा कणा तुटला.
#UttarPradesh: Woman sold her 15-day-old baby for Rs 45000 for treatment of her ailing husband in #Bareilly's #Mirganj, says "didn't have adequate funds" pic.twitter.com/HtJMZOtlpz
— ANI UP (@ANINewsUP) January 2, 2018
सुरुवातीला त्यानं कर्ज घेऊन उपचार करण्याच प्रयत्न केला... यासाठी त्यांचं राहत मोडकं घरंही गहाण ठेवावं लागलं. कर्जदारांनीही पैशांसाठी मागे तगादा लावला. त्यामुळे, नाईलाजानं संजूनं आपल्या १५ दिवसांच्या मुलाला केवळ ४५ हजारांत विकून टाकलं. या महिलेला एक पाच वर्षाचा आणि दोन वर्षांचा अशी दोन मुलं आहेत.
संजूनं आपल्या मुलाला बरेली जिल्ह्यातील बहेडी तहसीलमध्ये कुणाला तरी विकलंय. परंतु, ती खरेदीदाराचं नाव मात्र घेत नाहीय. नवजात बालकाला विकल्याचं प्रशासन अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहचून पीडित कुटुंबाला मदत देण्याचं आश्वासन दिलंय.