काश्मीरच्या लालचौकात महिलेनं केलं असं काही... पोलीसही बघत राहिले

स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक अशा लाल चौकामध्ये एका महिलेनं भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जोरदार घोषणा दिल्या.

Updated: Aug 15, 2017, 08:25 PM IST
काश्मीरच्या लालचौकात महिलेनं केलं असं काही... पोलीसही बघत राहिले title=

श्रीनगर : स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक अशा लाल चौकामध्ये एका महिलेनं भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जोरदार घोषणा दिल्या. लाल चौकामध्ये त्यावेळी महिला आणि पोलीससोडून कोणीही उपस्थित नव्हतं.

बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी महिलेचा हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. महिलेची ही घोषणाबाजी ऐकून पोलीसही हैराण झाले आणि त्यांनी याबाबत वरिष्ठांना फोनवरून माहिती दिली, असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एवढच नाही तर पोलीस गाडी आणण्यासाठीही सांगत आहेत. तुम्ही भारतीय आहात आणि भारत माता की जय म्हणणं तुमचं कर्तव्य आहे, असं ही महिला पोलिसांना सांगतं आहे.

श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकवण्यासाठी आलेल्या २०० भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याचबरोबर फुटिरतावाद्यांना आव्हान देणाऱ्या एका १५ वर्षांच्या मुलीला श्रीनगर विमानतळावरूनच परत पाठवण्यात आलं आहे.