PF मधून घरबसल्या काढा एक मिनिटात पैसे, प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर

गरज पडल्यास एक विशिष्ट रक्कम तुम्ही काढू शकता. घर बसल्या तुम्ही एक मिनिटात कसे पैसे काढू शकता...

Updated: Sep 3, 2022, 05:24 PM IST
PF मधून घरबसल्या काढा एक मिनिटात पैसे, प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर title=
Withdraw money from PF at home in a minute and know what the process is

Pf Account In A Few Minutes: प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीकडे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खात्यात असतं. नोकरी सोडल्यावर तुम्हाला Pf मधील पैसे मिळतात. शिवाय तुम्ही दुसरीकडे नवीन नोकरीवर गेल्यास हा Pf अकाऊंट तुम्ही सुरु ठेवू शकता. कधी कधी पैशांची अडचण असल्यास Pf अकाऊंटमधील जमा पैशांतून तुम्हाला काही रक्कम काढता येते. 

तसंच नवीन नियमनुसार पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर 8.5 टक्क्यांऐवजी 8.1 टक्केच व्याज मिळणार आहे.खरंत आपण आपल्या इच्छेनुसार खात्यातून पैसे काढू शकत नाहीत. मात्र गरज पडल्यास एक विशिष्ट रक्कम तुम्ही काढू शकता. घर बसल्या तुम्ही एक मिनिटात कसे पैसे काढू शकता, याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Withdraw money from PF at home in a minute and know what the process is)

असं काढा अॅडव्हान्स पीएफ

नोकरीदरम्यान पीएफमधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेला अॅडव्हान्स पीएफ असं म्हटलं जातं. आजारपणाचे उपचार, लग्न, घर बांधणे, शिक्षण इत्यादी गरजांसाठी तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. 

1. पहिल्यांदा तुम्हाला EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.

2. आता Services वर जा आणि For Employees वर क्लिक करा.

3. आता सेवांवर जाऊन सदस्य UAN/ऑनलाइन सेवा (OCS/OTCP) वर क्लिक करा.

4. सदस्य UAN/Online Service वर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.

5. आता तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून खात्यात लॉग इन करा.

6. लॉग इन केल्यानंतर, एक नवीन पेज दिसेल, इथे तुम्हाला ऑनलाइन सेवांवर जावं लागेल (फॉर्म 31, 19, 10C 10D) वर क्लिक करा.

7. आता तुम्हाला तुमची सर्व महत्त्वाची माहिती दिसेल- तुमचे नाव, बँक तपशील, पॅन क्रमांक इ. या सर्व गोष्टी नीट तपासल्यानंतर Verify वर क्लिक करा.

8. आता प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी होय वर क्लिक करा आणि नंतर ऑनलाइन दाव्यासाठी पुढे जा वर क्लिक करा.

9. आता तुम्हाला अनेक प्रकारचे पर्याय दिसतील. जिथे तुम्हाला PF Advance (फॉर्म 31) वर क्लिक करावे लागेल.

10. आता तुम्हाला पैसे काढण्याचे कारण विचारले जाईल, योग्य कारणावर क्लिक करा.

11. यानंतर, तुम्हाला हवी असलेली रक्कम टाका आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा.

12. आता तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता देखील द्यावा लागेल, त्यानंतर OTP वर क्लिक करा.

13. OTP आल्यावर OTP टाका आणि क्लिक करा. हे केल्यानंतर तुमची पैसे काढण्याची फाइल होईल. त्यानंतर लवकरच तुमच्या पीएफ खात्यातील पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील.