बुलेट ट्रेन प्रकल्पात मिळणार २४ हजार जणांना रोजगार

 पंतप्रधान मोदींच्या स्वप्नपूर्ती प्रकल्पाची बुलेट ट्रेन हजारो लोकांसाठी रोजगाराची संधी देणार असल्याचे विधान रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पायाभरणीवर कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते.  यामुळे ४००० थेट रोजगार निर्माण होतील आणि किमान २०,००० अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 12, 2017, 02:24 PM IST
बुलेट ट्रेन प्रकल्पात मिळणार २४ हजार जणांना रोजगार  title=

नवी दिल्ली :  पंतप्रधान मोदींच्या स्वप्नपूर्ती प्रकल्पाची बुलेट ट्रेन हजारो लोकांसाठी रोजगाराची संधी देणार असल्याचे विधान रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पायाभरणीवर कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते.  यामुळे ४००० थेट रोजगार निर्माण होतील आणि किमान २०,००० अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बुलेट ट्रेनसाठी कमी व्याज दर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जपानचे शिपाई शिन्जो आबे १४ सप्टेंबर रोजी या प्रकल्पाचा पायाभरणी करणार आहेत.  या प्रकल्पासाठी फार कमी व्याज दराने वित्तपुरवठा केला गेला आहे. बुलेट ट्रेनच्या प्रक्षेपणानंतर रेल्वेच्या कनेक्टीव्हीटीमध्ये एक क्रांतीकारी बदल घडणार असल्याचे गोयल म्हणाले.