मगरीचा हत्तीच्या पिल्लावर हल्ला, जबड्यात सोंड धरली आणि... पाहा व्हिडीओ

असं म्हणतात की आईचं प्रेम हे आपल्या बाळासाठी कधीही कमी होत नाही, मग तो माणूस असो किंवा कोणताही प्राणी. आईचं प्रेम हे असं प्रेम आहे. ज्याची जगात कशाशीही तुलना होऊ शकत नाही.

Updated: Aug 3, 2022, 07:00 PM IST
मगरीचा हत्तीच्या पिल्लावर हल्ला, जबड्यात सोंड धरली आणि... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडिया एक असं माध्यम आहे, जेथे तुम्हाला मनोरंजनाचं भंडार पाहायला मिळेल. येथे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे कनेन्ट उपलब्ध आहेत. ज्यामुळे लोकं एकदा सोशल मीडियावर ऑनलाईन आले की, त्यांचा वेळ कसा निघून जातो, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. सध्या सोशल मीडियावर एक असाच वेगळा व्हिडीओ समोर आला आहे. जो थरकाप उडवणारा आहे, तसेच तो आईच्या प्रेमाबद्दल देखील बरंच काही सांगून जात आहे.

असं म्हणतात की आईचं प्रेम हे आपल्या बाळासाठी कधीही कमी होत नाही, मग तो माणूस असो किंवा कोणताही प्राणी. आईचं प्रेम हे असं प्रेम आहे. ज्याची जगात कशाशीही तुलना होऊ शकत नाही. तसेच आई आपल्या मुलासाठी काय करु शकते याचं जिवंत उदाहरण आपल्याला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बेबी हत्तीच्या आईने आपल्या मुलाला मगरीपासून कसं वाचवलं, याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, जंगलात हत्तीचा कळप पाणी पित आहे. तेव्हा एका लहान हत्तीच्या सोंडेवर मगर हल्ला करते आणि त्याची सोंड आपल्या जबड्यात पकडू ठेवते. यानंतर तो लहान हत्ती इकडे तिकडे पळू लागतो. परंतु ती मग काही त्याची सोंड सोडायला तयार नसते. तेव्हा या लहान हत्तीची आई त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावते आणि त्याचे प्राण वाचवते.

आपल्या बाळाला वाचवण्यासाठी हत्ती या मगरीवर हल्ला करते, ज्यामुळे अखरे मग या छोट्या हत्तीची सोंड सोडून देतं आणि त्याचे प्राण वाचतात. हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे.

हा व्हिडीओ 38 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्यावर अनेक कमेंट्सही येत आहेत. काही लोकआईच्या धैर्याचे कौतुक करत आहेत, तर काहींनी लिहिले की हा व्हिडिओ आईच्या शुद्ध प्रेमाचा पुरावा आहे.