7th Pay Commission Update : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ( State Government Emlpoyees) आनंदाची बातमी आहे. सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्त्यामध्ये तब्बल 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्रिपुराचे ( Tripura) मुख्यमंत्री मानिक साहा ( Manik Saha) यांनी या निर्णयाला मंजूरी दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ही 1 जुलै 2022 पासून करण्यात आली आहे. मंत्री सुशांता चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (tripura govenrment give big decision increse 5 persent in dearness allowance on state govrnment employee)
त्रिपुरात पुढच्यावर्षी मार्च 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ केल्याने राज्य सरकारवर 523. 80 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा 1 लाख 4 हजार 83 कर्मचारी आणि 80 हजार 855 निवृत्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताही 34 टक्क्यांवरून 38 ते 39 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत मोदी सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते. वास्तविक, एआयसीपीआयच्या आतापर्यंत आलेल्या आकडेवारीमुळे महागाई भत्त्यात वाढ निश्चित असल्याचं स्पष्ट झालंय.