रेल्वेच्या दाराजवळच्या खिडकीला अधिक लोखंडी सळ्या का असतात? कारण जाणून व्हाल चकीत

Indian Railway News : Train Window - रेल्वे डब्याच्या प्रवेश दाराजवळच्या खिडक्या या अन्य खिडक्यांपेक्षा वेगळ्या का असतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्ही निरखून पाहिले तर त्याला जास्त लोखंडी सळ्या असतात.

Updated: Jun 3, 2023, 03:46 PM IST
रेल्वेच्या दाराजवळच्या खिडकीला अधिक लोखंडी सळ्या का असतात? कारण जाणून व्हाल चकीत title=
Indian Railway News, Train Window

Indian Railway News : Train Window - देशात सर्वात दळणवळाचे मोठे  जाळे भारतीय रेल्वे आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. भारतीय रेल्वेला आपल्या देशाची लाईफलाईन देखील म्हटले जाते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. तुम्ही कधी रेल्वेने प्रवास केला असाल तर तुमच्या लक्षात एक गोष्ट आली आहे का? रेल्वेच्या डब्यात प्रवेश करताना दाराजवळच्या खिडक्यांना जास्तीचे गज अर्थात लोखंडी सळ्या असतात. 

तुम्हीही आयुष्यात एकदा तरी रेल्वेने प्रवास केला असेल. त्याचवेळी, असे बरेच लोक असतील जे आठवड्यातून किंवा महिन्यातून अनेक वेळा  रेल्वेने प्रवास करतात. पण प्रवासादरम्यान तुम्ही कधी विचार केला आहे का की रेल्वे डब्याच्या प्रवेशदाराजवळच्या खिडक्या बाकीच्या खिडक्यांपेक्षा वेगळ्या का असतात? त्या खिडक्यांना बाकीच्या खिडक्यांपेक्षा जास्त रॉड का असतात? जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे माहित नसतील तर हरकत नाही, आज आम्ही तुम्हाला त्यामागचे खास कारण सांगत आहोत. 

बातमीतील फोटोकडे लक्ष द्या. तुमच्या लक्षात येईल की दरवाज्याजवळील खिडक्यांमध्ये लोखंडी बारची संख्या जास्त आहे, तर दरवाज्यापासून दूर असलेल्या इतर खिडक्यांना कमी बार आहेत, ज्यामुळे त्यांच्यामधील अंतर देखील जास्त आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, हे असं का?

रेल्वेतून प्रवास करताना चोरीच्या घटना घडत असतात. याचा विचार करुन रेल्वेने दाराजवळच्या खिडकीला अधिक सळ्या लावल्याचे सांगितले जाते. रेल्वे डबा प्रवेशदाराजवळील खिडक्यांना इतरांपेक्षा जास्त बार आहेत, कारण या खिडकीतून चोरीची शक्यता जास्त असते, विशेषतः जेव्हा प्रवासी झोपलेले असतात. जेव्हा स्टेशनवर रेल्वे उभी राहते आणि दुसऱ्याबाजूने या खिडक्यांना हात लावून चोरटे सामान चोरत असतात. कारण या खिडक्यांच्या पायरीवर पाय ठेवून सहज पोहोचता येते. उर्वरित खिडक्यांमधून चोरी करणे सोपे नसते. कारण जेव्हा ट्रेन स्टेशनवर फलाटाच्या बाजूस उभी असते तेव्हा खिडक्यांची उंची खूप जास्त असते, त्यामुळे चोरांना या खिडक्यांमधून चोरी करणे शक्य होत नाही.

चोरी यासारख्या अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांचा या चोरांपासून बचाव करण्यासाठी या खिडकीत इतर खिडक्यांपेक्षा जास्त बार लावण्यात आले आहेत. दरम्यान, जेव्हापासून रेल्वे डब्याच्या दाराजवळील खिडक्यांना जास्त बार लावले, तेव्हापासून ट्रेनमधील चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.