हॉटेल किंवा ट्रेनमध्ये पांढऱ्या रंगाच्या चादरी का वापरतात? जाणून घ्या यामागचं कारण

सुट्ट्यांमध्ये पर्यटनस्थळी जाण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि स्वस्त म्हणून आपण ट्रेन प्रवासाला प्राधान्य देतो. पर्यटनस्थळी गेल्यावर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये थांबला असाल. या संपूर्ण दौऱ्यात तुमच्या एक गोष्ट निदर्शनास आली असेल की, हॉटेल किंवा ट्रेनमध्ये पांढरी चादर दिली जाते. 

Updated: Nov 9, 2022, 07:42 PM IST
हॉटेल किंवा ट्रेनमध्ये पांढऱ्या रंगाच्या चादरी का वापरतात? जाणून घ्या यामागचं कारण title=

Why White Colored Bedsheet Used in Train: सुट्ट्यांमध्ये पर्यटनस्थळी जाण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि स्वस्त म्हणून आपण ट्रेन प्रवासाला प्राधान्य देतो. पर्यटनस्थळी गेल्यावर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये थांबला असाल. या संपूर्ण दौऱ्यात तुमच्या एक गोष्ट निदर्शनास आली असेल की, हॉटेल किंवा ट्रेनमध्ये पांढरी चादर दिली जाते. तुम्ही कधी विचार केला आहे का? हॉटेल किंवा ट्रेनमध्ये पांढऱ्या चादरीचा वापर का केला जातो? यामागे एक खास कारण आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर याबाबत जाणून घ्या..

पांढरी चादर वापरण्यामागे हे आहे कारण

हॉटेल किंवा ट्रेनमध्ये बेडशीट स्वच्छ करण्यासाठी ब्लीचचा वापर केला जातो. ब्लीचिंगमुळे रंगीत चादरी फिक्या पडू शकतात. त्यामुळे ग्राहकांसमोर वाईट छबी निर्माण होऊ शकते. दुसरीकडे पांढऱ्या चादरीवर ब्लीचचा तसा काही फरक दिसून येत नाही आणि स्वच्छही होतात. ब्लीचिंगमुळे चादरींना दुर्गंधी येत नाही. यासाठी हॉटेल आणि ट्रेनमध्ये रंगीत चादरींऐवजी पांढऱ्या चादरींचा वापर केला जातो. 

Bank Locker Rules: बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, मौल्यवान वस्तू ठेवण्यापूर्वी ही बातमी वाचा

पांढऱ्या रंगामुळे प्रवासी आणि ग्राहकांना शांत वाटतं

पांढऱ्या चादरीच्या वापरामुळे प्रवाशांना शांत वाटतं. पांढरा रंग पाहून तणाव कमी होतो. यामुळे प्रवाशांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर पांढरी बेडशीट पाहिल्यावर मन प्रसन्न होतं. दुसरीकडे पांढऱ्या रंगावर डाग स्पष्ट दिसतात. त्यामुळे आपल्या दिलेल्या चादरी धुतलेल्या आहेत की नाही हे देखील लगेच कळतं.