'विराट' घोडा... याने का लावला PM मोदी, राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्र्यांना लळा?

परेडच्या शेवटी राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेल्या विराटला निवृत्त केले.

Updated: Jan 27, 2022, 01:09 PM IST
'विराट' घोडा... याने का लावला PM मोदी, राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्र्यांना लळा? title=

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या शूर सुपुत्रांनी आपले शौर्य आणि पराक्रम जगाच्या आणि भारताच्या शत्रूंना दाखवून दिले आहे. पण त्याचवेळी असं दृश्य पाहायला मिळालं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एका घोड्याजवळ गेले आणि त्याला प्रेमाने गोंजारु लागले. परंतु एका घोड्यावर इतकं प्रेम का? असा प्रश्न लोकांना पडला आहे. हा घोडा राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील महत्वाचा घोडा आहे. त्याचे नाव विराट आहे. जो आपल्या सेवेतून निवृत्त झाला आहे.

भारताने 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. या दिवशी राजपथ येथे परेडचे आयोजन करण्यात आले होते. या परेडच्या शेवटी राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेल्या विराटला निवृत्त केले. विराटला निरोप देण्यासाठी पीएम मोदी, राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः राजपथवर पोहोचून त्याला निरोप दिला. यावेळी सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

विराट का आहे इतका खास?

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या ताफ्यातील विराट हा सामान्य घोडा नाही. तो होनोवेरियन जातीचा घोडा आहे. त्याने हेमपूरच्या रिमाउंट ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2003 मध्ये राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा कुटुंबात त्याचा समावेश करण्यात आला. प्रतिभासिंग पाटील, प्रणव मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांचे 19 वर्षांच्या सेवेत त्याने संरक्षण केले. भारतीय लष्कराने विराटला त्याच्या गुणवत्ता, शौर्य आणि सेवांसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमांडमेंट कार्ड देऊन सन्मानित केले आहे.

पंतप्रधान मोदींनीकडून निरोप

विराटच्या निरोपाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला त्याच्या जवळ जाण्यापासून आणि त्याला हात लावण्यापासून रोखू शकले नाहीत. राष्ट्रपती आणि राजनाथ सिंह यांच्यासोबत राजपथवर पोहोचले आणि विराटला प्रेमाने मिठी देखील मारली. यासोबतच पीएम मोदींनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून विराटची माहितीही घेतली.

13 वर्षांपासून अंगरक्षक कुटुंबाचा भाग

सुरुवातीला जंपिंग टीमचा भाग असलेल्या विराटने अनेक विक्रम केले. त्यानंतर क्षमता आणि विशेष गुण पाहून त्यांची कमांडंट चार्जर म्हणून निवड झाली. विशेष म्हणजे हा मान प्रत्येक घोड्याला मिळत नाही. विराट गेल्या 13 वर्षांपासून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशाच्या राष्ट्रपतींसोबत चार्जरच्या रुपात दिसला आहे. यासोबतच त्यांनी राष्ट्रपतींसोबत बीटिंग द रिट्रीट सेरेमनी आणि विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागत समारंभालाही हजेरी लावली आहे. या गुणांमुळे आता विराटला चार्जर म्हणून नवी आणि वेगळी ओळख आणि सन्मान मिळाला आहे.

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांचा चार्जरचा सन्मान स्वीकारला

विराटबद्दल आणखी एक गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे त्याच्या गुणवत्तेसाठी आणि केलेल्या सेवांसाठी त्याला चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्ड देण्यात आले आहे. विराटला त्याच्या शिस्त आणि कर्तव्यदक्षतेसाठी हा सन्मान देण्यात आला आहे.