मुंबई : कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेने देशभरात कहर केला असून, त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन सरकार करत आहे. कोरोनासोबतच महागाई ही लोकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे सोने - चांदी खरेदीबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) आज सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. MCX वर सोन्याचे दर 48300 रुपये प्रति तोळे ट्रेड करीत होते. तर चांदीचे दर 63022 रुपयांवर ट्रेड करीत होते.
राज्यात लग्न सराईमुळे सोन्याची मागणी वाढली असून, सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. तरीही मुंबई, पुणे, जळगाव अशा सोन्याच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये सोन्याचे दर घसरलेले दिसून आले.
कालपेक्षा स्थानिक बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दरांत तब्बल 450 हून अधिक रुपये प्रति तोळेंची घसरण झाली. तर चांदीच्या दर देखील 100 रुपये प्रति किलोने वाढून घसरून 63,200 रुपये प्रति किलो इतके झाले होते.
प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (24 कॅरेट)
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरांमध्ये वाढ होऊन 56 हजार प्रतितोळेंवर पोहचले होते. आज सोने 47 हजार 500 च्या आसपास ट्रेड करीत आहे.
त्यामुळे रेकॉर्ड हाय पेक्षा सोने स्वस्तच मिळत असल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल दिसून येत आहे.