TV मालिकांना डेली सोप का म्हणतात? यामागचं कारण फारच रंजक

भारतात डेलीसोपचा क्रेज भरपूर आहे. येथे घराघरात डेलीसोप पाहिले जातात.

Updated: Apr 18, 2022, 05:00 PM IST
TV मालिकांना डेली सोप का म्हणतात? यामागचं कारण फारच रंजक title=

मुंबई : भारतात डेलीसोपचा क्रेज भरपूर आहे. येथे घराघरात डेलीसोप पाहिले जातात. गृहीणींसाठी हे मनोरंजनाचं साधन आहे. त्यामुळे बहुतांश महिला याला पाहातात. भारतीय टेलिव्हिजनच्या मालिकांना नवी दिशा देण्याचं काम एकता कपूरनं केलं. एक काळ असा होतो जेथे बालाजी प्रोडक्शच्या मालिका टीव्हीवर आपलं वर्चस्व गाजवत होत्या. आता एकता कपूर ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळली आहे. परंतु असं असलं तरी तिच्या अशा अनेक मालिका किंवा डेलीसोप आहेत, ज्या कधीही न विसरण्यासाख्या आहेत.

ज्यांमध्ये कसोटी जिंदगी की, क्यूँ की साँस भी कभी बहू थी, कहानी घर घर की यांसारख्या डेलीसोपचा समावेश आहे. ज्यांनी अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे.

परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की या टीव्हीवरील मालिकांना डेलीसोप असं का म्हटलं जातं? तर आज आम्ही तुम्हाला या मागचं कारण सांगणार आहोत, जे खूपच मनोरंजक आहे.

खरंतर हे नाव भारताबाहेरुन आलं आहे आणि कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु बाहेरील देशात देखील डेलीसोप पाहिले जातात.

19व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपीय लोक कामाच्या शोधात अमेरिकेत पोहोचू लागले. युरोपातील हवामान हे सर्वात थंड मानले जाते, त्यामुळे येथील लोक दररोज अंघोळ करत नाहीत. परंतु त्यांच हे वागणं अमेरिकेतील लोकांना आवडायचं नाही. इथूनच खरंतर 'डेली सोप' शब्दाचा पाया घातला गेला.

पण आता तुमच्या मनात हा प्रश्न उद्भवेल की, त्याचा संबंध टीव्ही सीरियलशी कसा आहे? चला तर आपण हे नीट जाणून घेऊ.

युरोपातील लोकांना स्वच्छतेचा धडा शिकवण्यासाठी अमेरिकेतील लोकांना खूप कष्ट करावे लागले. त्यांनी स्वत:ला स्वच्छ ठेवता यावे यासाठी देशात युरोपीयन लोकांसाठी स्वच्छता मोहीम राबवली. ज्यामुळे न्यूयॉर्क शहरात सार्वजनिक स्नानगृहे बांधली गेली. अनेक कंपन्यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली. परंतु या उपायांनी काहीही फरक पडला नाही, ज्यामुळेनंतर रेडिओचा वापर केला गेला.

20 व्या शतकात अशा मालिका प्रसिद्ध झाल्या, ज्यात स्वच्छता ठेवण्याचे नियम शिकवले गेले. या कार्यक्रमांमध्ये साबण वापरण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर आपला फायदा पाहून हळूहळू साबण निर्मात्यांनी अशा मोहिमेसाठी निधी देणे सुरू केले. यामध्ये P&G सारख्या कंपन्यांचा समावेश होता.  ज्यामुळे अशा कार्यक्रमांना 'डेली सोप' असं नाव पडलं.

टीव्हीच्या सुरुवातीच्या काळात प्रवासी युरोपियन लोकांमध्ये स्वच्छतेची जाणीव वाढावी म्हणून असे कार्यक्रम रोज दाखवले जायचे. परंतु नंतर त्यांची जागा मालिकांनी घेतली, पण त्यांना देखील डेली सोप देखील म्हटले जाऊ लागले. हळूहळू हा शब्द जगभर प्रसिद्ध झाला. अशा प्रकारे या मालिकांना डेली सोप्स असे नाव देण्यात आले.