रात्री 10 ते 6 याच काळात का दाखवाव्यात कंडोमच्या जाहिराती? : न्यायालय

टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या जाहिराती दिवसा न दाखवता त्या रात्री 10 ते पहाटे 6 याच कालावधीत दाखविण्यात याव्यात, या निर्णयावर राजस्थानम उच्च न्यायालयाने केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 20, 2017, 04:48 PM IST
रात्री 10 ते 6 याच काळात का दाखवाव्यात कंडोमच्या जाहिराती? : न्यायालय title=

नवी दिल्ली : टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या जाहिराती दिवसा न दाखवता त्या रात्री 10 ते पहाटे 6 याच कालावधीत दाखविण्यात याव्यात, या निर्णयावर राजस्थानम उच्च न्यायालयाने केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

मंत्रालयाच्या निर्णयावर टीका

केंद्रीय सूचना आणि मंत्रालयाकडून आदेश जारी करण्यात आला की, कंडोमच्या जाहिराती रात्री 10 ते सकाळी 6 या काळात प्रसारित केल्या जाव्यात. अशा जाहिराती पाहिल्याने लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या जाहिरातींवर बंदी घालण्यात यावी, असे मंत्रालयाने म्हटले होते. मंत्रालयाच्या या निर्णयावर जोरदार टीका झाली होती.

न्यायालयाने पाठवली नोटीस

उच्च न्यायालयाने मंत्रालयांसोबतच केंद्र सरकारचे मुख्य सचिव आणि केंद्रीय आरोग्य सचिवांनाही नोटीस पाठवले आहे. या नोटीशीमध्ये विचारण्यात आले आहे की, रात्री 10 ते पहाटे 6 याच काळात कंडोमच्या जाहिराती का दाखवल्या जाव्यात. इतर काळात त्या का दाखवल्या जाऊ नये? 

मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जाहिरातिंवर बंदी

दरम्यान, सरकारकडून हा आदेश जारी करताना म्हटले होते की, हा निर्णय मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या तसेच, अश्लिल, उत्तेजना वाढवणाऱ्या, मुलांना चुकिच्या मार्गाला लावू शकणाऱ्या गोष्टींचा विरोध करणाऱ्या गोष्टींपासून सुरक्षा मिळवणाऱ्या कायद्या अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे.