10 रुपयांच्या नाण्यात खरंच पितळ वापरलं जातं?; दाव्याची सत्यता काय

Which material used in 10 rupees coin: 10 रुपयांच्या नाण्यात कोणता धातू वापरला जातो? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जाणून घ्या उत्तर

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 10, 2023, 12:18 PM IST
10 रुपयांच्या नाण्यात खरंच पितळ वापरलं जातं?; दाव्याची सत्यता काय title=
Which metals are used in the 10 rupees Indian coin

Indian  Currency: दैनंदिन व्यवहारासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठ्या प्रमाणात नाणे चलनात (Indian  Currency) आणले. यात पाच, दहानंतर आता वीस रुपयांचे नाणेही चलनात आले आहे. तर, नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर 10 रुपयांच्या नाण्यांचे बँकेकडून वाटप करण्यात आले. सोशल मीडियावर सध्या एक दावा केला जात आहे. चलनात असलेल्या दहा रुपयांच्या (10 Rupees Coin) नाण्यात असलेला वर्तुळाकार भाग पिवळ्या रंगाचा असतो. त्यामुळं दहा रुपयांच्या नाण्यात पितळ असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्याची सत्यता काय आहे हे आज पडताळून पाहूया. (10 Rupees Coin Fact Check)

पिवळ्या रंगाचा धातू

10 रुपयांच्या नाण्यात एक पिवळ्या रंगाचा धातू असतो. त्यामुळं या चर्चेला उधाण आलं आहे. 10 रुपयांच्या नाण्याची गोष्ट आपण आज जाणून घेऊया. 10 रुपयांच्या नाण्याचे वैशिष्ट्ये काय आहे हे पाहूयात. नाणे आकाराने गोल असून 27 मिलीमीटर इतके असते. या नाण्याचे वजन 7.71 ग्रॅम इतके असते. नाण्याच्या बाहेर असलेली वर्तुळाकार भाग 4.45 ग्राम वजनाचा असतो. तर त्यातील आतला भाग 3.26 ग्राम इतका असतो. 

स्टील आणि पितळ

नाण्याचा बाहेर असलेल्या पिवळ्या रंगाच्या भागाबद्दल बोलायचे झाले. तर त्या भागात अॅल्युमिनियम ब्रॉझ म्हणजेच पितळ आढळते. यात अनेक प्रकारच्या धातुंचे मिश्रण आढळले जाते. त्यानंतर त्याला पिवळा रंग प्राप्त होतो. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार, यात तांबे 6 टक्के, अॅल्युमिनियम 2 टक्के धातू आढळतात. 

2006मध्ये आले होते 10 रुपयांचे नाणे चलनात

दरम्यान, आज 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयांच्या नाण्यांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. यातील 2 रुपयांचे नाणे 1982मध्ये, 5 रुपयांचे नाणे 1992मध्ये चलनात आले. यानंतर 2006मध्ये 10 रुपयांची नाणी सरकारने चलनात आणली. दरम्यान काही दिवसांपूर्वी 10 रुपयांची नाणी चलनातून बाद करण्यात आल्याची अफवा पसरली होती मात्र, आरबीआयकडून ही अफवा फेटळण्यात आली होती. तसंच, कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेने चलनात असलेले प्रत्येक नाणे व नोटा स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेने अशा प्रकारचे नाण्याचे चलन नाकारू नये; अन्यथा कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही म्हटलं होतं.