माहितीये ना? तुमच्या Gifts वरही Income Tax विभागाची नजर; कधी आकारला जातो कर? जाणून घ्या

Income Tax On Gifts : आयकर विभागाच्या वतीनं आखून देण्यात आलेल्या अनेक तरतुगी, नियम आणि अटींचं पालन होणं अतिशय गरजेचं असतं.   

सायली पाटील | Updated: May 22, 2024, 01:29 PM IST
माहितीये ना? तुमच्या Gifts वरही Income Tax विभागाची नजर; कधी आकारला जातो कर? जाणून घ्या title=
Which gifts are not liable for income tax know before filing latest update

Income Tax On Gifts : भेटवस्तू... फक्त उल्लेख जरी केला तरीही एक वेगळाच उत्साह ऐकणाऱ्याच्या आणि बोलणाऱ्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. कारण, ही गोष्ट आहेच तशी. एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू देणं असो किंवा मग एखाद्या व्यक्तीकडून भेटवस्तू स्वीकारणं असो, आनंदाची मोहोर प्रत्येक क्षणाचा उमटतच असते. वाढदिवस, लग्न, सणवार, एखादा खास प्रसंग किंवा एखाद्या सामान्य दिवशीसुद्धा भेटवस्तूंची देवाणघेवाण अगदी सर्रास केली जाते. भेटवस्तूंमुळं होणारा आनंद एका बाजूला, पण त्यामुळं होणारा खर्च आणि त्याहीपलिकडे या भेटवस्तूंसाठी आकारला जाणारा कर, याविषयी सजग आहात ना? 

आयकर विभागाकडे करावी लागते भेटवस्तूंची नोंद 

आयकर परतावा भरत असतेवेळी अर्थात ITR फाइल करतेवेळी भेट स्वरुपात मिळालेल्या वस्तूंची नोंद आयकर विभागाकडे करावी लागते. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सध्या 31 जुलै 2024 पर्यंत इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणं अपेक्षित आहे. त्यामुळं भेटवस्तू आणि त्यावर आकारल्या जाणाऱ्या आयकराच्या रकमेविषयीचे नियम लक्षात ठेवणं अनेकांच्याच फायद्याचं. 

भेटवस्तूंवर का आकारला जातो कर? 

भेटवस्तू या दुसऱ्या व्यक्तीकडून आलेल्या असतात. ज्यामुळं त्या Income from another source विभागात मोडतात. एका आर्थिक वर्षात तुम्हाला मिळालेल्या भेटवस्तूंची किंमत जर, 50 हजार रुपये किंवा त्याहून जास्त असेल तर, त्यावर कर आकारला जातो. ही रक्कम तुमच्या वार्षिक उत्पन्नात जोडली जाते. ज्यामुळं तुम्ही करदात्यांच्या श्रेणीत गणले जाता. 

कोणकोणत्या भेटवस्तूंवर आकारला जातो कर? 

Income Tax विभागाकडून कोणकोणत्या वस्तूंवर कर आकारला जातो यासंदर्भात अनेकांनाच संभ्रम आहे, पण सरसरकट सर्वच भेटवस्तूंवर कर आकारला जात नाही. तुमचं रक्ताचं नातं असणाऱ्या नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्यास अशा वेळी त्यावर कर आकारला जात नाही. त्यामुळं कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला कितीही महागडी भेटवस्तू देऊ शकतात.

हेसुद्धा वाचा : Driving License संदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल; पाहा आणि लक्षात ठेवा 

 

जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या मित्रपरिवातील कोणी 50 हजार रुपयांहून अधिक किमतीची भेटवस्तू, रोकड, दागिना, शेअर किंवा आणखी कोणतीही भेटवस्तू दिली तर मात्र कर आकारला जाऊ शकतो. 

भेटवस्तूंसंदर्भातील नियम समजून घ्या 

  • लग्नसमारंभात मिळणाऱ्या भेटवस्तू करमुक्त असतात. पण, नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या भेटवस्तू मात्र करपात्र असतात. 
  • पती आणि पत्नीमध्ये होणारी गिफ्टची देवाणघेवाण करपात्र नसते. 
  • सख्ख्या नातेवाईकांकडून मिळालेली संपत्ती करपात्र नसते. पण, त्या संपत्तीची विक्री केल्यास हा व्यवहार मात्र करपात्र असतो. 
  • मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून 50 हजार रुपयांपर्यंतची भेटवस्तू मिळाल्यास ती करमुक्त असते पण त्याहून महाग भेटवस्तू मात्र करपात्र ठरते.