ISRO Chief On Chandrayaan-4 : भारताचं पहिलं सूर्य मिशन Aditya L1 आता लॉन्चसाठी पूर्णपणे तयार आहे. आंध्रप्रदेशमधील श्रीहरीकोटा येथून 2 सप्टेंबर रोजी 11 वाजून 50 मिनिटांनी पहिल्या सोलार मिशनचा नारळ फुटणार आहे. PSLV मधून हे लॉन्चिंग होणार असल्याने आता सर्वांची धाकधूक वाढली आहे. चांद्रयान-3 नंतर आता इस्त्रोने दुसरी उडी घेतली आहे. त्यामुळे आता भारताचा मान उंचावत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आदित्य एल 1 लाँच करण्यापूर्वी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (S Somanath) यांनी तिरुपती येथील चेंगलम्मा परमेश्वरी मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
रॉकेट प्रक्षेपण करण्यापूर्वी इस्रोच्या अधिकाऱ्यांसाठी गेल्या 15 वर्षांपासून या मंदिराला भेट देण्याची परंपरा बनली आहे. Aditya L1 मोहिमेच्या पूर्वसंध्येला सोमनाथ मंदिरालाही भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी चांद्रयान-3 आणि आदित्य एल वन मिशन विषयी माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी आगामी इस्त्रोच्या प्लॅनविषयी खुलासा केला आहे.
इस्रो प्रमुखांना चांद्रयान-4 मोहिमेबद्दल विचारलं गेलं. त्यावेळी त्यांनी थेट उत्तर देण्याचं टाळलं. आम्ही अद्याप त्यावर (Chandrayaan-4) निर्णय घेतलेला नाही, आम्ही लवकरच त्याची घोषणा करू, असं एस सोमनाथ यांनी सांगितलं आहे. सन ऑब्झर्व्हेटरी मिशननंतर इस्रो आगामी काळात LV-D3 आणि PSLV सह इतर अनेक उपग्रह प्रक्षेपित करेल, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
#WATCH | ISRO chief S Somanath says "Today the countdown of Aditya L1 is starting and it will launch tomorrow around 11.50 am. Aditya L1 satellite is for studying our Sun. It will take another 125 days to reach the L1 point. This is a very important launch. We have not yet… pic.twitter.com/zdZn0g8LI0
— ANI (@ANI) September 1, 2023
दरम्यान, आदित्य-L1 अंतराळयान सूर्याचं दूरस्थ निरीक्षण करण्यासाठी आणि L1 (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जियन पॉइंट) वरील वास्तविक सौर वाऱ्याचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेलं आहे. पृथ्वीपासून अंदाजे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या या पाईंटवर यान भ्रमण करणार आहे. त्यामुळे सूर्यावर होत असलेल्या हालचालींची माहिती योग्यरित्या मिळवली जाऊ शकते.