Children's Day 2022: पहिला बालदिन कधी साजरा केला, 14 नोव्हेंबरलाच का होतो साजरा, जाणून घ्या!

Happy Children's Day 2022:  तुम्ही कधी विचार केलाय का? की बालदिन फक्त 14 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो? जाऊन घ्या.

पोपट पिटेकर | Updated: Nov 14, 2022, 10:31 AM IST
Children's Day 2022: पहिला बालदिन कधी साजरा केला, 14 नोव्हेंबरलाच का होतो साजरा, जाणून घ्या! title=

Happy Children's Day 2022 : आपण सर्वजण लहानपणापासून दरवर्षी बालदिन साजरा (Celebrating Children's Day) करत आलो आहोत. प्रत्येक पालकांना देवाने दिलेली सर्वात मोठी भेट म्हणजे लहान मुल ( Childrens ). मुले मनाने खरी असतात. बालदिन ( Children's Day ) हा दिवस साजरा करण्यामागील सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (First Prime Minister of India Jawaharlal Nehru)...नेहरुचं मुलांबद्दलचं प्रेम आणि आपुलकी हे सर्वात माहितीच आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का? की बालदिन फक्त 14 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो? जाऊन घ्या.

बालदिन आणि 14 नोव्हेंबर
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांना मुले प्रेमाने चाचा नेहरू (Chacha Nehru) म्हणायचे. कारण ते त्यांचा आदर आणि त्याच्यावर प्रेम करत. चाचा नेहरूंनाही मुलांबद्दल खूप जिव्हाळा होता आणि त्यांना नेहमी मुलांमध्ये राहायला आवडायचे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी मुलांसाठी आणि तरुणांसाठी खूप चांगले काम (Very good work) केले. ते पंतप्रधान (Prime Minister) झाल्यावर त्यांचे पहिले प्राधान्य मुलांच्या शिक्षणाला होते. तरुणांच्या विकासाला आणि रोजगाराला चालना (Promoting youth development and employment) देण्यासाठी त्यांनी भारतातील विविध शैक्षणिक संस्थाही सुरु केल्या. चाचा नेहरू म्हणायचे की मुले देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यांना योग्य शिक्षण, संगोपन (Education, upbringing) आणि प्रगतीच्या मार्गावर मार्गदर्शन करूनच नवजीवन मिळू शकते. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली (Pandit Jawaharlal Nehru tribute) वाहण्यासाठी त्यांच्या जन्मदिनाची तारीख म्हणजेच 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

पहिला बालदिन
बालदिनाची सुरुवात 1925 साली झाली. 
स्वातंत्र्यानंतर 1964 पूर्वी भारतात 20 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जात होता. 1953 मध्ये याला जगभरात मान्यता मिळाली. 20 नोव्हेंबर रोजी, संयुक्त राष्ट्रांनी ( United Nations) बालदिन साजरा करण्याची घोषणा केली. त्यामुळे भारतातही २० नोव्हेंबरला बालदिन साजरा (Children's Day is celebrated in November)  केला जाऊ लागला. पण अनेक देशांमध्ये तो वेगवेगळ्या दिवशीही साजरा केला जातो. 1950 पासून, बाल संरक्षण दिन (Child Protection Day) अनेक देशांमध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो. ज्याला जागतिक बालदिन (World Children's Day) म्हणतात. भारतात स्वातंत्र्यानंतर 1959 मध्ये पहिला बालदिन साजरा (First Children's Day celebration) करण्यात आला. पण 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्या निधनानंतर 20 नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस बदलून 14 नोव्हेंबर करण्यात आला. आजही जगातील अनेक देश 20 नोव्हेंबरलाच बालदिन साजरा करतात.

भारतात बालदिन साजरा 
बालदिन या दिवशी भारतभर अनेक सांस्कृतिक आणि आनंददायी उपक्रम (Cultural and recreational activities) आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. हा दिवस संपूर्ण भारतात सरकारी संस्था, शाळा, खाजगी संस्था (Government Institutions, Schools, Private Institutions) आणि इतर संस्थांद्वारे साजरा केला जातो. मुलांना त्यांच्या हक्कांची माहिती व्हावी आणि त्यांचे जीवन आनंदी व्हावे (Life should be happy) यासाठी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रमही विविध संस्थांकडून आयोजित केले जातात. 

बालदिन साजरा करण्याचा उद्देश 
कोणत्याही देशाचे भविष्य त्यांच्या सध्याच्या मुलांवर अवलंबून (The future of the country depends on the children) असते. मुलांचा विकास चांगला झाला नाही तर त्यांचा विकास होऊ शकणार नाही आणि देशाच्या भवितव्यात योगदान देण्यास ते सहकार्य करू शकणार नाहीत. म्हणूनच संपूर्ण समाजाने मुलांच्या हक्कांकडे (Towards Children's Rights) आणि त्यांच्या विचारांकडे (thoughts) लक्ष देण्याची गरज आहे. यासोबतच समाजातील लोकांनी मुलांसाठी भूतकाळात  काय केले आणि भविष्यात (in the future) ते काय करू शकतील याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण विकसित राष्ट्राचे स्वप्न पाहू शकतो कारण केवळ मुलेच देशाची भावी दिशा ठरवू शकतात आणि देशाच्या विकासात आपली भूमिका बजावू शकतात.