नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत लोकांमधले एक ब्रूनेईचे सुल्तान हसनल बोल्कियाह हे आपल्या राजेशाही थाटासाठी जानले जातात.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आसियान समिटमध्ये भाग घेण्यासाठी ते बुधवारी दिल्लीला पोहोचले. त्यावेळी त्यांचं विमान पाहून सगळेच हैराण झाले. कारण सुल्तान हे स्वत: आपले विमान उडवून घेऊन आले होते.
सुल्तान हसनल बुधवारी स्वत: आपलं जम्बो जेट पायलट बनून घेऊन आले. विमान जेव्हा दिल्लीत पोहोचलं तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेले अधिकारी देखील हे पाहून हैराण झाले.
71 वर्षांचे सुल्तान जेव्हा भारतात आले तेव्हा अचानक देशाच्या लोकांमध्ये यांची चर्चा सुरु झाले. काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना विमान चालवण्याची आवड आहे. याआधी जेव्हा ते 2008 आणि 2012 मध्ये भारतात आले होते तेव्हा देखील त्यांनी स्वत: आपलं विमान आणलं होतं. सुल्तान यांच्याकडे 747-400 जंबो जेट उडवण्यासाठी पायलटांची टीम देखील आहे.
विमान उडवण्यासोबतच सुल्तान यांचे अनेक छंद आहेत. सुल्तान यांना महागडी कार खरेदी करण्याचा शौक देखील आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. काही वर्षांपूर्वी असं देखील होतं की, ब्रूनेईच्या सुल्तान यांच्याकडे सर्वात जास्त महागड्या गाड्या होत्या. या गाड्या ठेवण्यासाठी त्यांचं अंडरग्राऊंट गॅरेज देखील आहे. ज्यामध्ये 100 पेक्षा अधिक महागड्या गाड्या आहेत.