Anant Ambani annual salary : जगातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी घेतलं जाणारं नाव म्हणजे मुकेश अंबानी. वार्षिक उलाढालीचा आकडा 10 लाख कोटी रुपयांच्या पलिकडे नेणाऱ्या मुकेश अंबानी यांना त्यांच्या या व्यवसायामध्ये पत्नीपासून मुलांपर्यंत आणि आता सुनांपर्यंत सर्वांचीच साथ मिळताना दिसत आहे. अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि त्यांची सून राधिका मर्चंट या जोडीनंही कुटुंबाचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी मोलाचं योगदान दिल्याचं पाहायला मिळालं.
वीजनिर्मिती आणि उत्पादन क्षेत्रामध्ये रिलायन्स उद्योग समुहाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अनंत आणि राधिकानं महत्त्वाचं योगदान दिलं. जाणून आश्चर्य वाटेल, पण अंबानींच्या तिन्ही मुलांना प्रत्येकी 80,52,021 शेअर म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एकूण भागिदारीतून 0.12 टक्के भाग देण्यात आला आहे.
इतरांच्या पगाराची तरतूद करणाऱ्या या समुहाकडून अनंत अंबानीलाही पगार दिला जातो, हे तुम्हाला माहितीये का? सूत्रांच्या माहितीनुसार दरवर्षी अनंत अंबानीसाठी कंपनी साधारण 4.2 कोटी रुपये इतका पगार मोजते. ईशा अंबानीला दिला जाणारा पगाराचा आकडाही अनंतइतकाच असल्याचं सांगितलं जातं.
रिलायन्स रिटेल, जिओ प्लॅटफॉर्ममध्ये संचालकपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या आकाश अंबानीला रिलायन्स समुहाकडून 5.4 कोटी रुपये इतका पगार दिला जातो. दरम्यान, धाकट्या मुलाला अर्थात अनंत अंबानीला दिला जाणारा पगार कोणालाही हेवा वाटेल इतकाच आहे. रिलायन्स उद्योग समुहाच्या पारंपरिक उर्जास्त्रोत आणि तत्सम प्रकल्पांसाठीच्या कामांमध्ये अनंतचं महत्त्वाचं योगदान आहे. त्याशिवाय CSR प्रोजेक्ट मध्येही तो भरीव योगदान देत असून, समाज आणि पर्यावरणाप्रती समुहाचं स्थान आणि जबबादारी ओळखत अनंत कायम उल्लेखनीय कामगिरी बजावताना दिसतो.
अंबानी कुटुंबाचं व्यवसाय क्षेत्रात असणारं योगदान अतिशय मोठं आहे. असं असलं तरीही कुटुंबातील सदस्यांनासुद्धा या क्षेत्रात आपलं कसब सिद्ध करून दाखवावं लागतं. किंबहुना प्रत्येकाच्या कौशल्यानुसारच मुकेश अंबानींकडून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाताना दिसतात. अगदी त्यांची मुलंही इथं अपवाद नाहीत.