What is Digital Arrest: सायबर गुन्हेगारी विश्वात सध्या डिजिटल अरेस्ट या नव्या प्रकारानं धुमाकूळ घातलाय. सायबर भामटे थेट तुम्हाला फोनवरच अरेस्ट केलं आहे असं धमकावतात. तसेच दंडाच्या रूपात तुमच्याकडून पैसे उकळतात. मोठ्या शहरांप्रमाणेच संभाजीनगर सारख्या शहरात डिजिटल ऍरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्या येतेय. पण डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय? यामुळे तुमची कशाप्रकारे फसवणूक होऊ शकते? यापासून वाचण्यासाठी काय करायला हवं? सविस्तर जाणून घेऊया.
तुम्हाला सीबीआय, ईडी, एनसीबीतून फोन आला असेल तर सावधान... हा फोन सायबर भामट्यांचाही असण्याची शक्यता आहे. सायबर भामट्यांनी नवा लुटीचा धंदा सुरु केलाय. डिजिटल अरेस्टची धमकी देऊन लुटण्याचा नवा फंडा सायबर गुन्हेगारांनी सुरु केलाय. संभाजीनगरमध्ये एका तरुणाला डिजिटल अरेस्टची भीती घालून लुटण्यात आलंय. या तरुणाला त्याच्यासंदर्भातल्या एका पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणातून सुटकेसाठी त्याच्याकडं पन्नास हजारांची खंडणी मागण्यात आली.
सायबर भामटे तुम्हाला व्हिडीओ कॉल करतात. व्हिडीओ कॉलवरून तुमच्या नावाचं एक पार्सल सापडलंय अशी बतावणी करतातपार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचं धमकावतात त्यानंतर तुमचं बॅंक अकाऊंट मनी लाउंडरींगसाठी वापरले जातेय असंही सांगतात. तुमच्या आधार कार्डाचा वापर करून अनेक सिमकार्ड्स घेतली गेली आहेत अशा थापा मारून घाबरवून टाकलं जात . त्यानंतर घरात किंवा एखाद्या हॉटेलच्या खोलीत सतत व्हिडिओ कॉल समोर बसून राहण्याची जबरदस्ती करण्यात येते.ईडी , सीबीआयसारख्या विविध खात्यांचे अधिकारी असल्याचं सांगून धमकावलं जातं. काही वेळेला तर कोर्टाचा सीन उभा करून सुनावणी करण्यात येते. सध्या फोनवरून धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. संभाजीनगर शहरात गेल्या 2 महिन्यात 10 जणांची डिजिटल अरेस्टद्वारे फसवणूक झालीय.
डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना फसवण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झालीय. . केंद्र सरकारनं डिजिटल अरेस्टपासून नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय. तुम्हालाही जर असा फोनवरून डिजिटल अरेस्ट केलं असं धमकावत असलं तरीही घाबरू नका, जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधा आणि फसवणूक टाळा.