मोदी कॅबिनेटमधून बाहेर झालेले बाबूल सुप्रियो यांनी ममता यांच्या टीएमसीला केले फॉलो, पक्ष बदलण्याचे संकेत

भारतीय जनता पक्षाकडून बाबूल सुप्रियो यांना टॉलीगंज विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Updated: Jul 14, 2021, 09:26 AM IST
मोदी कॅबिनेटमधून बाहेर झालेले बाबूल सुप्रियो यांनी ममता यांच्या टीएमसीला केले फॉलो, पक्ष बदलण्याचे संकेत title=

मुंबई : पश्चिम बंगालमधील (West Bengal) आसनसोलचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांच्याबाबत चोरदार चर्चा सुरु झाली आहे. एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर ते राजकारणातून निवृत्त होतील अशी चर्चा आहे. त्याचवेळी काही लोक असे सांगत आहेत की, ते तृणमूल काँग्रेसच्या (TMC) संपर्कात आहेत. त्यांनीही ट्विटरवर मुकुल रॉय आणि टीएमसीला फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. (Babul Supriyo out of modi cabinet followed mamata tmc speculations about changing the party)

केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर बाबूल सुप्रियो यांनी फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गायक ते राजकीय नेता झालेले सुप्रियो यांनी असे लिहिले होते की, ज्या पद्धतीने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले गेले ते योग्य नाही. राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले होते. सुप्रियो यांच्या राजीनाम्यानंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही संताप व्यक्त केला होता. दरम्यान, बाबूल सुप्रियो आणि ममता बॅनर्जी यांच्यातील नातं कधी चांगले नव्हते. लोकसभा निवडणुका ते विधानसभा निवडणुकांपर्यंत बंगालमध्ये त्यांच्यावर आणि त्यांच्या समर्थकांवर बर्‍याचदा हल्ला झाला होता.

विधानसभा निवडणुकीत पराभव 

बाबूल सुप्रिया यांना भारतीय जनता पक्षाकडून टॉलीगंज विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यांना या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते.

विशेष म्हणजे बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर भाजपमध्ये मोठे खिंडार पडण्यास सुरुवात झाली होती. अनेक नेत्यांनी पक्ष सोडला होता. प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावरही अनेक नेत्यांनी जहरी टीका केली. केंद्रात मंत्री न बनविल्याबद्दल पक्षातील अनेक नेते संतप्त आहेत.

प्रदेशाध्यक्ष घोष म्हणाले की, अशा टिप्पण्यांमुळे कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. ते म्हणाले, “मी त्यांना जाहीरपणे विविध विधानांची जाणीव करून दिली, त्यांनी कोणतेही विचार न करता निवेदने कशी दिली. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य कमी होते आणि हे थांबले पाहिजे. पक्षात जी विधाने व्हायला हवी होती ती जाहीरपणे दिली गेली.