मुंबई : राजस्थानमधील जोधपूर येथील एका हॉटेलमध्ये एका तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. जे ऐकून संपूर्ण परिसरात बातमी वाऱ्यासारखी पसरली. या तरुणीला तिच्या बहिणीसोबत रुग्णालयात पाठवण्यात आले, जेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. यानंतर या तरुणी सोबत नक्की काय घडलं असेल? याबाबत प्रश्न उपस्थीत होऊ लागते. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा खुलासा घेतला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीला तिच्या प्रियकराने हॉटेलच्या एका खोलीत बोलवले, ज्यानंतर तिच्या नकळत तिला ड्रग्स देऊन तिच्यावर रेप केला. परंतु या दरम्यान या तरुणाच्या लक्षात आलं की, तरुणीच्या हृदयाची ठोकेच बंद झाले. ज्यानंतर या तरुणाने या तरुणीच्या बहिणीला बोलावलं आणि त्यांना रिक्षातून पाठवून दिलं.
यानंतर तरुणीला पावटा रुग्णालयात नेण्यात आले, तेथून डॉक्टरांनी तिला महात्मा गांधी रुग्णालयात रेफर केले. महात्मा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. डीसीपी म्हणाले की, महात्मा गांधी हॉस्पिटलमधून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि प्रकरणाचा आढावा घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि तिच्या बहिणीला हॉटेलमधून टॅक्सीत बसवून समीर म्हणजेच आरोपी जयपूरला निघाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस हॉटेलवर पोहोचले असता, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणाला पाहून त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली. यामध्ये युवक हा मृताच्या मावशीचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर आरोपीला पकडल्यानंतर पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले असता तेथे काही नशेचे पदार्थ आढळून आले. दारूची बाटलीही सापडली. मुलीने स्वतः ड्रग्स घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर जेव्हा आरोपीची कसून चौकशी केली असता तरुणाने हे ड्रग तिला नकळत दिल्याचे सांगितले.
तरुणीच्या मृतदेहाता पोस्टमॉर्टम केला गेला, परंतु अद्याप डॉक्टरांना मृत्यूचे कारण स्पष्ट करता आलेले नाही.