GFच्या घरी गेला अन् संध्याकाळी येताच त्याचा मृत्यू झाला, घरी नेमकं काय घडलं?

GFच्या घरी जाणं BF ला पडलं महागात, कुटुंबियांनी केला गंभीर आरोप!

Updated: Nov 6, 2022, 11:51 PM IST
GFच्या घरी गेला अन् संध्याकाळी येताच त्याचा मृत्यू झाला, घरी नेमकं काय घडलं? title=

Crime News : बिहारची राजधानी पाटणा येथून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी त्याची हत्या झाल्याचा आरोप आहे. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Went to GFs house and died on arrival in the evening what exactly happened at home Marathi Crime News)  

छोटू कुमार (20 वर्षे) याचे कंकरबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोस्टल पार्कमधील मुन्शी भगत परिसरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मुलीच्या घरच्यांना हा प्रकार कळताच त्यांनी दुपारी एक वाजता छोटूला घरी बोलावून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर सायंकाळी हा तरुण घरी परतल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नर्सिंग होममध्ये नेलं होतं मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. यासोबतच कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे. तरुणीचा मित्र चंदन याच्या सांगण्यावरून छोटू तिच्या घरी गेला होता. 

छोटू त्या मुलीला त्याच्याशी लग्न करायचं म्हणत होता. त्यासाठी आम्हीही सहमती दर्शवली. मात्र मुलीचे घरचे लोक माझ्या मुलासोबत असे करतील हे माहीत नव्हते. मुलीचा भाऊ आणि तिच्या वडिलांनी ही हत्या केली आहे, असा आरोप मृत तरुणाच्या आईने केला आहे.