वधू-वराच्या लग्नाचे Invitation पाहून पाहूण्यांना धक्का, लग्नाला जायला कोणीच तयार नाही, असे काय आहे त्यात?

एका लग्नात दोन्ही कुटूंबीयांनी वेडिंग प्लॅनरवर लग्नाची संपूर्ण जबाबदारी सोपवली. 

Updated: Jul 19, 2021, 03:51 PM IST
वधू-वराच्या लग्नाचे Invitation पाहून पाहूण्यांना धक्का, लग्नाला जायला कोणीच तयार नाही, असे काय आहे त्यात? title=

मुंबई : सध्या क्रिएटिविटी (Creativity)चा जमाना आहे, त्यामुळे आपल्याकडे क्रिएटिव्हीटी दाखवणाऱ्यांची कमी नाही. लोक त्यांना जिथे मिळेल तेव्हा आपली क्रिएटिविटि दाखवतात. परंतु काही लोकं क्रिएटिविटी दाखवण्याच्या नादात असे काही विचित्र करुन बसतात की, त्याला काही तोड नसतो. लग्न म्हटले की भारतीय लोकं खूप आनंदी होतात. कारण त्यांना लग्नात नवीन कपडे घालून फिरायला तर मिळते, त्याच बरोबर काही लोकांसाठी लग्न म्हणजे त्यांच्या खाण्याची चंगळ. आपण लग्नात पहिले गेलो की, जेवायला काय आहे? कोणती डिश आहे हे शोधतो. परंतु अशा लग्नात तुम्हाला काही अट घातली तर? असंच काहीसं एका लग्नात झालं आहे.

नक्की काय घडलं?

एका लग्नात दोन्ही कुटूंबीयांनी वेडिंग प्लॅनरवर लग्नाची संपूर्ण जबाबदारी सोपवली. परंतु या वेडिंग प्लॅनरने अशी काही आमंत्रण पत्रिका छापली आहे की, ते वाचून तुम्ही त्या लग्नातले जेवन जेवायचे तर सोडाच पण तुम्ही तेथे जाण्याचा स्वप्नात देखील विचार करणार नाही.

काही दिवसांपूर्वी एक विचित्र लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका व्हायरल झाली आहे. ही पत्रिका इव्हेंट मॅनेजरने अतिथींना मेलद्वारे पाठवलेली आहे.

या विचित्र लग्न पत्रिकेत अतिथींसाठी काही खास अटी सांगितल्या गेल्या आहेत.अतिथींनी या अटींचे पालन केले, तरच ते या लग्नाचा भाग होऊ शकतील. माध्यमांच्या वृत्तानुसार, लग्नाच्या नियोजकाने अतिथींना लग्नाला उपस्थित राहण्यासाठी ईमेल पाठवला होता. या मेलच्या माध्यमातून त्यांने लग्नाचे काही नियम सांगितले होते.

लग्नाच्या नियोजकांनी ईमेलमध्ये लिहिले- 'सुप्रभात. मी सर्व पाहुण्यांची मोजणी करण्यासाठी आणि लग्नाच्या दिवसासाठी काही नियम देत आहे.'

त्यानंतर या मेलच्या आत एक डिजीटल कार्ड होतं. त्यामध्ये कपड्यांच्या रंगापासून ते भेटीपर्यंतचे सगळे नियम लिहलेले होते.

मेलमध्ये लोकांना पहिला प्रश्न विचारला- आपण प्लस वन असलेल्या लग्नाला उपस्थित राहणार आहात का?
यानंतर लग्नात सामील होण्यासाठी काही नियम सांगितले गेले.

1. लग्नात 15-30 मिनिटांपूर्वी पोहोचावे.
२. कृपया पांढरा किंवा क्रिम रंगाचे कपडे घालू नका.
3. कृपया संपूर्ण चेहऱ्यावर मेकअप लावू नका.
4. विवाह सोहळ्याच्या वेळी रेकॉर्डिंग करू नका.
5.सूचना दिल्याशिवाय फेसबुकवर चेक इन करु नका.
6. वधूशी अजिबात बोलू नका.
7. साडेपाच हजार रुपयांहून अधिक किंमतीची भेट आणा ($75) अन्यथा प्रवेश उपलब्ध होणार नाही

या अशा अटी वाचल्यानंतर आता पाहुण्यांना या लग्नात जाण्याची भीती वाटत आहे. हे कोणत्या प्रकारचे आमंत्रण आहे. हे त्यांना समजू शकलेलं नाही. सोशल मीडियावर हे आमंत्रण व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या कार्डवर मोठ्याप्रमाणावर कमेंट्स केल्या आहेत.