VIRAL VIDEO : लग्न लागण्याआधीचं वर-वधूनं जेवणावर मारला ताव जोडपं

एका जोडप्याने विधी पूर्ण आधी जेवणावर ताव मारला.

Updated: Jul 10, 2021, 11:57 AM IST
VIRAL VIDEO : लग्न लागण्याआधीचं वर-वधूनं जेवणावर मारला ताव जोडपं  title=

मुंबई : सध्या लग्न मंडपातील अनेक किस्से तुफान गाजत आहेत आता देखील एका जोडप्याने विधी पूर्ण आधी जेवणावर ताव मारला. ऐरवी लग्न लागल्या शिवाय वधू-वर काही खावू शकरत नाही. पण या जोडप्याने तर सगळं काही बाजूला ठेवून थेट जेवणालर ताव मारला आहे. इन्स्टाग्राम रिल्समध्ये या जोडप्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही एका खोलीत जेवताना दिसत आहे. 

नवरी खाण्यात इतकी व्यस्त आहे की तिच्या मेकअपचं देखील भान राहिलेलं नाही. नवरीच्या दोन मैत्रिणी जोडप्याचा व्हिडिओ शूट करत आहेत. फक्त वधूचं नाही तर वर देखील फक्त आणि फक्त खाण्यात व्यस्त आहे. जेव्हा नवरीच्या समोर मोमोजची प्लेट येते तेव्हा तिचं आनंद बघण्यासारखं आहे, पाहा व्हिडिओ....

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ Dulhaniyaa या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेन्टचा वर्षाव केला आहे.