या एका चुकीमुळे वधूकडच्या लोकांनी वराकडच्या लोकांना धू-धू धूतलं

नवरदेवाच्या भावामुळे सगळ्यांनाच बसला मार

Updated: Nov 20, 2018, 04:18 PM IST
या एका चुकीमुळे वधूकडच्या लोकांनी वराकडच्या लोकांना धू-धू धूतलं title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यातील असमोली भागात ओवरी गावात वधूकडच्या लोकांनी वराच्या भावाची चांगलीच धुलाई केली. कारण फक्त इतकं होतं की त्याने वधूवर शॅम्पेन उडवली. वधूच्या भावाने वधूवर शॅम्पने उडवल्याने वधूचा भाऊ, बहिण आणि इतर लोकांची चांगलीच धुलाई केली. यामुळे विवाह थांबला आणि हा वाद पोलीस स्थानकात जावून पोहोचला.

सूत्रांच्या माहितीनुसार, ओवरी गावात मुलीची घरी वरात आली. वरात आल्यानंतर जयमालाची विधी सुरु होती. या दरम्यान वराच्या भावाने मुलीवर पैसे उडवण्यास सुरुवात केली. मुलीच्या भावाने याला विरोध केला. त्यानंतर वराच्या भावाने शॅम्पेन उडवण्यास सुरुवात केली. यानंतर मुलीकडचे लोकं भडकले आणि इतर लोकांना देखील घेरलं आणि त्यांची चांगलीच धुलाई केली.

ही गोष्ट पोलिसांना कळताच पोलीस या ठिकाणी पोहोचले. दोन्ही बाजुच्या पाहुण्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस स्थानकात हा वाद संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.