'आपल्याला कोरोनासोबत राहण्याची सवय करायला हवी '

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचं वक्तव्य..  

Updated: May 11, 2020, 01:42 PM IST
'आपल्याला कोरोनासोबत राहण्याची सवय करायला हवी ' title=

नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत दिवसागणित वाढ होत आहे. त्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव रोखायचा कसा हा मोठा प्रश्न आता राज्य करकार आणि केंद्र सरकार पुढे येवून ठेपला आहे. अशात आता आपल्याला कोरोना व्हायरससोबत जगायला शिकायला हवं असं वक्तव्य दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केलं आहे. गेल्या २४ तासांत भारतात ४ हजार २१३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर आता भारतात कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ वर पोहोचली आहे.

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, 'फक्त दिल्लीतच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. हा धोकादायक व्हायरस दोन-तीन महिन्यांमध्ये नष्ट होणारा नाही. त्यामुळे आपल्याला कोरोना व्हायरससोबत जगायला शिकायला हवं ' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

रविवारी रात्री दिल्लीमध्ये कोरोनाचे ३१० नवे रुग्ण सापडले. ही सख्या लक्षात घेता आता दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या ७ हजार २३३ वर पोहोचली आहे.  महाराष्ट्रानंतर गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. 

२४ तासांत भारतात ४ हजार २१३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर आता भारतात कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ वर पोहोचली आहे. रविवारी ही संख्या ६२ हजार ९३९ एवढी होती. सध्या ४४०२९  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २२०६ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.