नवी दिल्ली : कोरोनाची अगदीच कमी लक्षणं असणाऱ्या आणि पूर्वलक्षणं असलेल्या रुग्णांसाठी आता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कोरोनाची फारच कमी लक्षणं असलेल्या किंवा कोरोनाआधीची लक्षणं असलेल्या रुग्णांना घरीच अलगीकरण करता येणार आहे. घरीच अलगीकरण केलेला रुग्ण सुरुवातीची लक्षणं दिसू लागली त्यापासून १७ दिवसांनी अलगीकरण संपवू शकेल. पूर्वलक्षणं असलेल्या रुग्णांसाठी सँपलिंग केल्याच्या दिवसापासून १७ दिवस मोजले जातील. दोन्ही प्रकारच्या रुग्णांना अलगीकरण संपवण्याआधी १० दिवसांत ताप आला नसेल तरच अलगीकरण संपवलं जाईल, अशी अट घालण्यात आली आहे.
घरीच विलगीकरणात असलेल्या रुग्णांना आणि त्यांची देखभाल करणाऱ्या घरातील व्यक्तींना ट्रिपल लेयर मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना
याशिवाय रुग्णाची काळजी घेणाऱ्यांसाठीही नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
याआधी २७ एप्रिलला केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. आता सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.