'आम्ही ८० टक्के आहोत, तुम्ही केवळ १८ टक्के; CAA ला विरोध करू नका'

CAA आणि NRC हे कायदे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तयार केले आहेत.

Updated: Jan 4, 2020, 10:56 PM IST
'आम्ही ८० टक्के आहोत, तुम्ही केवळ १८ टक्के; CAA ला विरोध करू नका' title=

बरेली: भाजप आमदार सोमशेखर रेड्डी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) आंदोलन करणाऱ्या अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. CAA ला विरोध करणाऱ्यांना भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. तुम्ही एवढेच लक्षात ठेवा की, देशात आम्ही ८० टक्के आहोत आणि तुम्ही (मुस्लिम) १८ टक्के आहात. त्यामुळे आम्ही सगळ्याचा ताबा घेतला तर काय परिस्थिती उद्भवेल, याचा फक्त विचार करा, असे सोमशेखर रेड्डी यांनी म्हटले. ते शुक्रवारी बरेली येथील एका सभेत बोलत होते. 

मला CAAविषयी फारशी माहिती नाही- विराट कोहली

यावेळी त्यांनी देशातील अल्पसंख्याक समुदायाला सरळसरळ धमकावले. तुम्हाला देशात राहायचे असेल तर आमच्या परंपरा पाळल्याच पाहिजेत. CAA आणि NRC हे कायदे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तयार केले आहेत. तुम्ही त्याला विरोध केलात तर चांगले होणार नाही, असेही यावेळी सोमशेखर रेड्डी यांनी म्हटले. 

'असदुद्दीन ओवेसींना क्रेनला उलटे टांगून त्यांची दाढी भादरून टाकेन'

एवढेच नव्हे तर हा निर्णय मान्य नसेल तर तुम्ही पाकिस्तानला चालते व्हावे. आमची कोणतीही तक्रार नाही. आम्ही जाणीवपूर्वक तुम्हाला तिकडे पाठवणार नाही. मुस्लिमांनी हिंदुंशी एकोप्याने वागावे. तुम्ही आमच्याशी शत्रूप्रमाणे वागलात तर तुम्हालाही तशीच वागणूक मिळेल, असेही सोमशेखर रेड्डी यांनी सांगितले.