जम्मू काश्मीर : पुलवामा भागात दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय. भारताला हवा असलेला दहशतवादी नूर मुहम्मद याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलेय. दरम्यान, पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार करण्यातआलेय.
या भागात अजूनही जवानांकडून शोध मोहीम सुरू आहे. तर राखचिक्री नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या तीन जवानांना ठार केलं. तर एक जवान जखमी झाल्याचं पाकिस्तानच्या मीडियाने म्हटलंय.
जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात केरी सेक्टर येथे नियंत्रण रेषेजवळ मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासहीत चार सैनिकांना कुरापती पाकच्या हल्ल्यात वीरमरण आलं होतं. याला प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी पाकिस्तानचे तीन सैनिक मारले.