Lagn Muhurt 2024 in Marathi: डोक्याला बाशिंग बांधण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरीही 2023 मध्ये लग्न न झालेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप सारे मुहूर्त घेऊन येत आहे. यामुळे विवाहित तरुण-तरुणीच आपल्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू करतात. यासोबतच हा हंगाम बाजाराच्या दृष्टिकोनातूनही खास असतो. लग्नसराई सुरू होण्यापूर्वीच बाजारपेठा विशेष सजतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत विवाहसोहळ्यांचेही मोठे योगदान आहे. सध्या खरमासामुळे 1 महिना लग्नसराईला ब्रेक लागला होता. हिंदू धर्मात पौष महिना शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. मकरसंक्रांतीला पुन्हा लग्नसराईचा हंगाम येईल. 2024 मध्ये चातुर्मास सुरू होण्यापूर्वी जानेवारी ते जुलै 2024 पर्यंत लग्नासाठी शुभ मुहूर्त कधी आहेत ते जाणून घेऊया.
मंगळवार, 16 जानेवारी 2024 - संध्याकाळी 8:01 ते 17 जानेवारी रोजीसकाळी 7:15 पर्यंत
बुधवार, 17 जानेवारी 2024 -सकाळी 7:15 ते रात्री 9:50 पर्यंत
20 जानेवारी 2024, शनिवार - मध्य रात्री 03:09 ते 21 जानेवारी सकाळी 7.14 पर्यंत
रविवार, 21 जानेवारी 2024 - सकाळी 07:14 ते 07:23 पर्यंत
सोमवार, 22 जानेवारी 2024 -सकाळी 07:14 ते 23 जानेवारी रोजी संध्याकाळी 04:58 पर्यंत
शनिवार, 27 जानेवारी 2024 संध्याकाळी 07:44 ते 28 जानेवारी रोजी सकाळी 7:12
रविवार, 28 जानेवारी 2024 - सकाळी 7:12 ते दुपारी 3:53 पर्यंत
मंगळवार, 30 जानेवारी 2024 - सकाळी 10:43 ते 31 जानेवारी रोजी सकाळी 7:10 पर्यंत
31 जानेवारी 2024, बुधवार - 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 07:10 ते दुपारी 01:08 पर्यंत
रविवार, 04 फेब्रुवारी 2024 - सकाळी 07:21 ते 05 फेब्रुवारी रोजी 05:44 पर्यंत
मंगळवार, 06 फेब्रुवारी 2024 दुपारी 1:18 ते - 07 फेब्रुवारी रोजी 06:27 पर्यंत
07 फेब्रुवारी 2024, सकाळी 4:37 ते बुधवार - 8 फेब्रुवारी रोजी 07:05 पर्यंत
08 फेब्रुवारी २०२४, गुरुवार - सकाळी 7:5 ते सकाळी 11:17
सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 दुपारी 02:56 ते 13 फेब्रुवारी रोजी 07:02 पर्यंत
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 दुपारी 02:41 ते 14 फेब्रुवारी रोजी 05:11 पर्यंत
शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 - सकाळी 8.46 ते दुपारी 1.44
शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 - दुपारी 1:35 ते रात्री 10:20
रविवार, 25 फेब्रुवारी 2024 - 01:24 pm ते 26 फेब्रुवारी रोजी 06:50 am
सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 - सकाळी 06:50 ते दुपारी 03:27
गुरुवार, 29 फेब्रुवारी 2024 - सकाळी 10:22 ते मार्च 1, 06:46 am
01 मार्च 2024, शुक्रवार - सकाळी 06:46 ते दुपारी 12:48
02 मार्च 2024, शनिवार - 08.24 ते 03 मार्च रोजी सकाळी 06.44
रविवार, 03 मार्च, 2024 - सकाळी 06:44 ते संध्याकाळी 05:44
04 मार्च 2024, सोमवार - 05 मार्च रोजी रात्री 10.16 ते 06.42 पर्यंत
मंगळवार, 05 मार्च, 2024 - 06:42 AM ते 02:09 PM
06 मार्च 2024, बुधवार - 07 मार्च रोजी दुपारी 02:52 ते 06:40 पर्यंत
गुरुवार, 7 मार्च 2024 - सकाळी 6.40 ते सकाळी 8.24
रविवार, 10 मार्च 2024 - 11 मार्च रोजी दुपारी 01:55 ते 06:35 पर्यंत
सोमवार, 11 मार्च, 2024 - सकाळी 06:35 ते 12 मार्च, 06:34 am
मंगळवार, 12 मार्च, 2024 - 06:34 AM ते 03:08 PM
गुरुवार, 18 एप्रिल 2024 - 19 एप्रिल रोजी सकाळी 12:44 ते 05:51 पर्यंत
शुक्रवार, 19 एप्रिल, 2024 - 05:51 AM ते 06:46 AM
शनिवार, 20 एप्रिल 2024 - दुपारी 02:04 ते 21 एप्रिल मध्यरात्री, 02:48 am
रविवार, 21 एप्रिल, 2024 - 22 एप्रिलच्या सकाळी 03:45 ते 05:48 पर्यंत रात्री उशिरा
सोमवार, 22 एप्रिल 2024 - सकाळी 05:48 ते रात्री 08
शुक्र अस्तामुळे मे आणि जूनमध्ये कोणतेही शुभ कार्य होणार नाही.
मंगळवार, 9 जुलै 2024 - दुपारी 2.28 ते संध्याकाळी 6.56
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)