मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या राजकारणात जितकं योगदान देत असतात तितकेच ते कलेलाही फारच प्राधान्य देतात. मुख्य म्हणजे त्यांच्या राजकीय धोरणांमध्ये कलेलाही एक वेगळं असं स्थान प्राप्त आहे. अशा पंतप्रधानांची एक वेगळी बाजू सध्या सर्वांसमोर आली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमुळे मोदींमध्ये दडलेली एक कवीमनाची व्यक्ती पुन्हा सर्वांसमोर आली आहे.
अर्पण फिल्म्सच्या वतीने साकारण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे. हा व्हिडिओ बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. त्यातीलच एक कारण म्हणजे ज्या गाण्यावर या मुलींनी ठेका धरला आहे, त्या गाण्याची शब्दरचना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
अतिशय सुरेख अशा या गीतातून नवरात्रोत्सव आणि गरबा नृत्याचं महत्त्वं सांगण्यात आलं असून त्यातून गुजरातच्या संस्कृतीचं दर्शन होत आहे.
Touched to see this.
The spirit of this Garba has been brought to life by these daughters!
Hope everyone's having a blessed Navratri. https://t.co/8JjwIJvdTL
— Narendra Modi (@narendramodi) October 13, 2018
अंधमुलींनीही मोठ्या उत्साहात या गाण्यावर ठेका धरला असून, त्यांचीही दाद द्यावी तितचकी कमीच आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर या गाण्याची बरीच चर्चा पाहायला मिळत असून, खुद्द मोदींनीही याविषयी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.