VIRAL VIDEO: महिलेकडून सासऱ्याला बेडसहित जाळण्याचा प्रयत्न; पतीने रेकॉर्ड केलं कृत्य!

एका महिलेने आपल्या सासऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तिचे हे धक्कादायक कृत्य तिच्या पतीनेच कॅमेऱ्यात कैद केले आहे. 

Updated: Nov 1, 2023, 09:16 PM IST
VIRAL VIDEO: महिलेकडून सासऱ्याला बेडसहित जाळण्याचा प्रयत्न; पतीने रेकॉर्ड केलं कृत्य! title=

VIRAL VIDEO:  एका महिलेने सासऱ्याला बेडसहित जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून वृद्ध सासरा थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे महिला सासऱ्याला जाळण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या पतीनचे तिचे हे धक्कादायक कृत्य कॅमेऱ्यात कैद केले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय?

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती बेडवर झोपल्याचे दिसत आहे. एक महिला किचनमध्ये एका कापडाचा तुकडा पेटवून हा जळता तुकडा वृद्ध व्यक्ती झोपलेल्या बेडवर टाकते. मात्र, याचवेळी हा पेटता तुकडा बाजूला हटवण्यात येतो. यामुळे या वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला आहे. 

नवऱ्यानेच रेकॉर्ड केला पत्नीचा व्हिडिओ

सासऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेचे कृत्य तिच्या पतीनेच कॅमेऱ्यात कैद केले आहे. सासऱ्याला जिवंत जाळण्याचा या महिलेचा डाव होता. पतीने तिच्या या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. मात्र, त्यावेळी त्याने हा जळता कापडाचा तुकडा बेडवून बाजूला सारला. यामुळे या वृद्धाचा जीव बचावला आहे. 

व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे. हे समजू शकलेले नाही. व्हिडिओ शेअर करणाऱ्याने लोकेशन शेअर केलेली नाही.  @ShoneeKapoor नावाच्या X हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. शेकडो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. या महिलेचे कृत्य पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या महिलेचा कृत्य अत्यंत धक्कादायक असल्याचे कमेंट अनेकांनी केल्या आहेत. 

सुनेने केली सासूची हत्या

मुंबईतील चेंबूरच्या पेस्तमसागर येथे सुनेने सासूची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. 70 वर्षांच्या सज्जाबाई पाटील त्यांचा दत्तक मुलगा  आणि सुनेबरोबर पेस्तमसागर इथल्या एसआरए इमारतीत राहत होत्या. घाटकोपरमधील एका मंदिरापुढे भीक मागून सज्जाबाई कुटुंबियांची गुजराण करत होत्या. इमारतीतलं घर ही सज्जाबाईच्या नावावर होतं. मुलगा कामावर गेल्यावर सासू सुनेवर संशय घेऊन रोज सुनेला  हिणवायची. यावरूनच सून अंजना आणि सासू सज्जाबाईचं भांडण होऊन रागाच्याभरात या सुनेनं सासूची खेळण्यातल्या बॅटनं हत्या केली. बाथरुमध्ये पडल्यानं सासूचा मृत्यू झाल्याचा सुनेचा बनाव पोलिसांनी उघडकीला आणला. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x