भांडी, कुंडी धुणेसोडा, या महिलेप्रमाणे बाईक चालवून दाखवा, पाहा कोण आहे ही ''सुपर वूमन''

सोशल मीडिया आजच्या काळात एक असे माध्यम आहे, ज्यावर आपल्याला नेहमी मजेदार व्हीडिओ पाहायला मिळतात. 

Updated: Jun 16, 2021, 05:36 PM IST
भांडी, कुंडी धुणेसोडा, या महिलेप्रमाणे बाईक चालवून दाखवा, पाहा कोण आहे ही ''सुपर वूमन'' title=

मुंबई : आपल्यापैकी काही लोकं अ‍ॅक्शन सिनेमांचे चाहाते असतात, त्यामुळे सुपर हिरो, सुपर वुमन किंवा एखादा पावरफुल व्यक्तीरेखेबद्दल आपल्याला फार कुतुहल असते. लहानमुलं तर अशा व्यक्तीरेखेला साकारण्याचा देखील प्रयत्न करतात. लहानमुलांसाठी या व्यक्तिरेखा खऱ्या असतात. परंतु आपल्याले हे माहित असतं की, हे खरेखुरे घडत नाही तर हा सगळा VFX आणि एडिटिंगची कमाल आहे. कारण अशी सुपर नॅचरल पॉवर खऱ्या आयुष्यात कोणाकडेच नसते. परंतु आम्ही तुम्हाला सांगितले की, खऱ्या आयुष्यात एक 'सुपर वूमन' आहे, तर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु तुम्हाला हे पटवून द्यायला आमच्याकडे एक व्हीडिओ आहे. ज्याला पाहिल्यानंतर तुमची खात्री पटेल.

सोशल मीडिया आजच्या काळात एक असे  माध्यम आहे, ज्यावर आपल्याला नेहमी मजेदार व्हीडिओ पाहायला मिळतात. त्यातील काही लोकांना हसवणारे व्हीडिओ असतात, तर काही लोकांना चक्कं करणारे असतात. असाच लोकांना विचार करायला लावणारा आणि लोकांना आश्चर्यचकित करणारा एक व्हीडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्ही 'सुपर वूमन' पाहू शकता.

या व्हीडिओमध्ये  एक महिलेने आपल्या डोक्यावर भांड्यांनी भरलेला टब ठेवला आहे. तर तिने एका हातात बादली आणि दुसऱ्या हातात बॅग घेतली आहे. एवढेच नाही तर, ती हे सगळ घेऊन पाण्यामधून बाईक चालवत आहे. ती एवढा  हा व्हीडिओ आजकाल लोकांमध्ये चर्चेचा विषय बनत आहे, जो लोकांना विचार करायला लावत आहे, एवढेच नाही तर बरेच यूझर्स याला 'महिला शक्ती' असेही कमेंट्स करत आहेत.

व्हीडिओ पाहून तुम्हालाही एका क्षणासाठी आश्चर्य वाटले असेल. हा व्हीडिओ ट्विटरवर '@Dr.Ajayita' नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हीडिओसह त्यांनी एक मजेदार कॅप्शन देखील लिहिले आहे. "She got multiple talents"आता हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओवर खूप मजेदार कमेंट्स देखील येत आहेत.