Viral Video Cheetah Agility While Catching A Deer: इंटरनेटवरील रंजक व्हिडीओमध्ये शिकारीचे आणि वाइल्ड लाइफ थीमवर आधारित व्हिडीओंचं नाव प्राकर्षाने घेतलं जातं. सामान्यपणे वाघ किंवा सिंह अथवा मगरींकडून केल्या जाणाऱ्या शिकारीचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका चित्ता शिकार करताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चित्त्याच्या तावडीतून शिकार सुटणार की काय असं वाटत असताना त्याने दाखवलेल्या चपळतेच्या जोरावर तो आपल्या भक्ष्यावर तुटून पडतो.
इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमधील अधिकारी साकेत बडोला यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आङे. या व्हिडीओमध्ये एका उतारावर एक चित्ता समोरुन येणाऱ्या हरणावर झडप घालण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. दबक्या पावलांनी झाडांमध्ये जाऊन लपून बसलेला चित्ता हरणाला पकडण्याचा प्रयत्न करतो त्या क्षणापासून व्हिडीओ सुरु होतो. समोर येणारं हरीण चित्त्याला पाहून त्याच्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न करतं. मात्र या हरणाला पकडण्यासाठी चित्ताही हवेमध्ये झेप घेतो. चित्ता हवेत बॅक फ्लिप मारत हरणाला पकडण्याचा प्रयत्न करतो.
या चित्त्याच्या पंजांचा स्पर्श या हरणाला झाल्यासारखा वाटतो. पण चित्त्याच्या तावडीतून हरीण सुटल्यासारखं वाटत असतानाच व्हिडीओच्या शेवटी हा चित्ता या हरणाच्या मानेवर चावा घेता दिसतो. म्हणजे क्षणभराच्या उडीमध्ये चित्त्याचा पंजा लागून जखमी झालेलं हरीण उतारावरुन खाली आल्यावर जखमी अवस्थत जमीनीवर पडतं आणि मृत्यूशी सुरु असलेली झुंज हारतं.
Agility is a desirable survival-linked trait in the wild (….and in life) !!
VC: In the video pic.twitter.com/F3Ge11Duqp— Saket Badola IFS (@Saket_Badola) February 10, 2023
हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याला आतापर्यंत 1 लाख 30 हजारांच्या आसपास व्ह्यूज आणि 2 हजार 800 हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करुन चित्त्याच्या चपळतेचं कौतुक केलं आहे. मांजर जातीच्या प्राण्यांना 9 जन्म असतात असं म्हणतात ते त्यांच्या याच चपळतेमुळे असं एकाने म्हटलं आहे. तर अन्य एकाने याला परफेक्ट टायमिंग असं म्हटलं आहे. काहींनी हा चित्ता एकदम निंजा असल्यासारखा वाटला असं म्हटलं आहे. दोघेही तोलामोलाचे होते पण इथं चित्ता जिंकला असा एकाने म्हटलं आहे.