टोमॅटोच्या सुरक्षेत ठेवला किंग कोब्रा? व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं समोर

King Cobra Viral Video: व्हायरल व्हिडिओमध्ये किंग कोब्रा टोमॅटोजवळ जमिनीवर रेंगाळताना दिसत आहे. टोमॅटोजवळ कोणीतरी हात पुढे करताच किंग कोब्राने लगेच त्याच्यावर हल्ला केला. किंग कोब्रा अॅक्टीव्ह मोडमध्ये दिसतोय. तो टोमॅटोजवळ बसून समोर असलेल्या लोकांवर लक्ष ठेवून आहे. थोड्या वेळाने कोब्रा भिंतीवर रेंगाळताना दिसतो पण टोमॅटोचे संरक्षण करणे सोडत नाही. ट्विटरवर 'हंसना जरूरी है' नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jul 21, 2023, 11:48 AM IST
टोमॅटोच्या सुरक्षेत ठेवला किंग कोब्रा? व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं समोर title=

King Cobra Viral Video: टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. टोमॅटोच्या किंमती कमी करण्याच्या सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेने दिलासा मिळाला असला तरी, अनेक लोक टोमॅटोचा पर्यायी मार्ग शोधत आहेत. दुसरीकडे, टोमॅटोच्या वाढत्या किमतीवर अनेक मीम्स, मजेशीर गाणी आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या सर्व मीम्स, मजेदार गाणी आणि व्हिडिओंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सर्वसाधारण व्यक्तींनी आपल्या आहारातून टॉमेटोला विश्रांती देणे पसंत केले आहे. तर काहीजण खिशाला कात्री लावून, इतर खर्च कमी करुन टॉमेटो खरेदी करत आहेत. टॉमेटोचे दर इतके वाढले आहेत की काहीजणांनी त्याच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर ठेवले आहेत. नवऱ्याने भाजीत टोमॅटो टाकल्याचा राग मनात धरून बायको घर सोडून गेली तर कुठे शेतातून टोमॅटो लुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. टोमॅटोचे भाव वाढल्याने झालेल्या गदारोळानंतर सरकारने त्याचा भाव 80 रुपये प्रतिकिलो केला आहे. असे असतानाही लोक अजूनही अधिक स्वस्त टोमॅटो शोधत आहेत.

लोक टोमॅटोच्या किमतीच्या प्रचंड वाढीबद्दल त्यांची मते सोशल मीडियात शेअर करत आहेत. नुकताच इंटरनेटवर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये किंग कोब्रा टोमॅटोचे रक्षण करताना दिसत आहे.

किंग कोब्रा टोमॅटोच्यावर बसला

व्हायरल व्हिडिओमध्ये किंग कोब्रा टोमॅटोजवळ जमिनीवर रेंगाळताना दिसत आहे. टोमॅटोजवळ कोणीतरी हात पुढे करताच किंग कोब्राने लगेच त्याच्यावर हल्ला केला. किंग कोब्रा अॅक्टीव्ह मोडमध्ये दिसतोय. तो टोमॅटोजवळ बसून समोर असलेल्या लोकांवर लक्ष ठेवून आहे. आता या व्हिडीओमागची कहाणी समोर आली आहे.

थोड्या वेळाने कोब्रा भिंतीवर रेंगाळताना दिसतो पण टोमॅटोचे संरक्षण करणे सोडत नाही. ट्विटरवर 'हंसना जरूरी है' नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओला यूजर्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स खूपच आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर रिट्विट केला.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

व्हिडिओच्या मूळ स्रोताची पडताळणी होऊ शकली नसली तरी, तो एक कोब्रा रेस्क्यूचा भाग असल्याचे दिसत आहे. किंग कोब्रा टोमॅटोने भरलेल्या कोपऱ्यात घुसला आणि बचाव पथक त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. 

जेव्हा टोमॅटोचे भाव गंभीर चिंतेचा विषय बनला असताना हा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. 47 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या. 

अनेक यूजर्सनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मजेशीर कमेंट्स लिहिल्या आहेत. 'टोमॅटोचे वाढलेले दर पाहता आम्ही आमच्या मौल्यवान स्टॉकला सुरक्षा पुरवली आहे.', असे मजेत म्हटले जात आहे.