हात नसलेल्या चिमुरड्याने तोंडात ब्रश धरून काढलं अप्रतिम चित्र.. सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव.. VIDEO एकदा पहाच

नऊ वर्षांचा मधू याला विजेचा शॉक लागला होता आणि त्यांनतर त्याला आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले.

Updated: Aug 27, 2022, 05:14 PM IST
हात नसलेल्या चिमुरड्याने तोंडात ब्रश धरून काढलं अप्रतिम चित्र.. सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव.. VIDEO एकदा पहाच title=

VIRAL VIDEO OF BOY WHO LOST HIS HANDS: असं म्हणतात कि देव एक गोष्ट आपल्याकडून घेतो अशावेळी  दुसरी अशी काहीतरी गोष्ट आपल्याला तो देतोच देतो जी खूप खास असते.

असाच प्रत्यय येणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चिमुकला आहे जो हनुमानाचं उत्तम चित्र काढताना दिसत आहे.

खरी बातमी ही आहे कि तोंडात ब्रश पकडून हा चिमुरडा हे चित्र रंगवतोय.. आता तुम्ही म्हणाल कि तोंडात ब्रश का पकडला आहे तर एका अपघातामध्ये या चिमुरड्याला आपले हाथ आणि पाय गमवावे लागले होते . 

मधू कुमार असं या मुलाचं नाव आहे नऊ वर्षांचा मधू याला विजेचा शॉक लागला होता आणि त्यांनतर त्याला आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले.

मात्र निराश न होता याने यावरही मात करत स्वतःमध्ये असणाऱ्या कलेला वाव दिला आणि जगासमोर आणली यामध्ये मधूला सर्वात जास्त मदत केली ती डॉकटर हर्ष यांनी. हा मुलगा सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय त्याच करावं तेवढं कौतुक कमीच आहे