मगरीला अन्न द्यायला गेलेल्या तरुणासोबत घडली भयानक घटना, तिने खाण्यासाठी तोंड उघडलं आणि...

मगर हा सर्वात भयंकर भक्षकांपैकी एक आहे. जर कोणी त्याच्या शक्तिशाली जबड्यात अडकला तर त्याला जिवंत सुटणे कठीण आहे. 

Updated: Jan 27, 2022, 04:51 PM IST
मगरीला अन्न द्यायला गेलेल्या तरुणासोबत घडली भयानक घटना, तिने खाण्यासाठी तोंड उघडलं आणि... title=

मुंबई : सोशल मीडियावरती आपल्या वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे फारच मनोरंजक असतात. आपल्याला सोशल मीडियावर प्राण्यांचे देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, असे व्हिडीओ पाहाणं लोकांना फार आवडतात. परंतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणासोबत घडलेल्या भयानक प्रकारा आहे. जो पाहिल्यावर तुम्हाला घाम फुटेल.

मगर हा सर्वात भयंकर भक्षकांपैकी एक आहे. जर कोणी त्याच्या शक्तिशाली जबड्यात अडकला तर त्याला जिवंत सुटणे कठीण आहे. मगर ही पाण्याच्या दुनियेतील एक 'राक्षस' आहे. त्यामुळे वन्यप्राणी देखील तिच्या जवळ जाण्यासाठी घाबरतात.

परंतु असं असुनही या तरुणाने मगरीच्या समोर जाण्याची हिंमत दाखवली. खरंतर या तरुणाच्या या कृतीला हिंमत म्हणावी की मुर्खपणा हे तुम्हीच हा व्हिडीओ पाहून ठरवा.

हा तरुण मगरीला खाणं देण्याच्या उद्देशाने तिच्या समोर गेला. परंतु जेव्हा मगरीने ते खाणं खाण्यासाठी तोंड उघडलं तेव्हा, त्यामुलाने घाबरुन ते अन्न हातातून सोडलं, परंतु त्यानंतर मगरीला मात्र खाणं खाण्यासाठी राहावलं नाही आणि तिने या तरुणाचा चावा घ्यायला आपलं तोंड उगडलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नशीबाने हा तरुण तिच्या जबड्यात अडकला नाही. यानंतर या मगरीने पुन्हा एकदा या तरुणावर वार केला, पण पुन्हा एकदा हा तरुण तिच्या तावडीतून सटकला. यानंतर मात्र तरुणाला त्याची चूक कळली आणि तो त्या ठिकाणापासून लांब निघून गेला.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ केवळ 25 सेकंदांचा आहे, मात्र तो व्हिडीओ तुमच्या हृदयाचे ठोके चूकवू शकतो.

मगरीचा हा आश्चर्यकारक व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डिस्कवरशार्क नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. 18 जानेवारीला अपलोड केलेला हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत 9 लाखाहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे.