लग्नात 'झुकेगा नही साला' म्हणणाऱ्या नवऱ्याला, नववधुने चांगलाच शिकवला धडा, पाहा व्हिडीओ

सध्या सर्वांनीच साऊथ स्टार अल्लु अर्जुनच्या पुष्पा सिनेमाला डोक्यावर घेतली आहे. यामधील गाणी, डायलॉग आणि अभनियाने सगळ्याच लोकांना भूरळ पाडली आहे.

Updated: Feb 26, 2022, 06:57 PM IST
लग्नात 'झुकेगा नही साला' म्हणणाऱ्या नवऱ्याला, नववधुने चांगलाच शिकवला धडा, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सध्या सर्वांनीच साऊथ स्टार अल्लु अर्जुनच्या पुष्पा सिनेमाला डोक्यावर घेतली आहे. यामधील गाणी, डायलॉग आणि अभनियाने सगळ्याच लोकांना भूरळ पाडली आहे. ज्यामुळे जिथे पाहावं तेथे तुम्हाला पुष्पाशी संबंधीत कोणतीही गोष्ट पाहायला मिळते. लोक सोशल मीडियावर रिल्स बनवताना देखील याच सिनेमामधील एखाद्या कंटेन्टवर व्हिडीओ बनवू लागले आहेत. सोशल मीडिया आणि रिल्सपर्यंत हे सगळं ठिक आहे. परंतु आता आपल्या खऱ्या आयुष्यात देखील लोक पुष्पामधील 'झुकेगा नही साला' हा डायलॉग वापरू लागले आहेत.

लोक अगदी आपल्या मित्रांसोबत हा डागलॉग बोलू लागले आहेत, एवढेच काय तर  नेता मंडळी देखील स्वत:ला अशी डायलॉग बाजी करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. मग आता हे जोडपं तरी कसं मागे राहाणार.

सध्या सोशल मीडीयावर दोन व्हिडीओ धुमाकुळ घालत आहे. जो पुष्पाच्या डायलॉगशी रिलेटेड आहे.

लग्नादरम्यान वरमाला घालताना वधु-वर आणि त्यांच्या घरातील लोकांची मजा-मस्ती सुरू असते. त्याच दरम्यान नवरदेवानं देखील फायदा उचलून नववधूला पुष्पाचा डायलॉग मारला. परंतु तो डायलॉग मारणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे. कारण त्यानंतर मात्र नववधूने त्याच्यासोबत जे केलं ते आश्चर्यकारक होतं. ज्याचा त्याने विचार देखील केला नसावा.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू आणि वर दोघांच्याही हातात वरमाला आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये जेव्हा नववधू नवरदेवाला वरमाला घालायला जाते, तेव्हा नवरदेवाची उंची जास्त असल्यामुळे नववधूचा त्याच्यापर्यंत हात पोहोचत नाही. परंतु नववधूला हार घालायला मदत न करता उलट नवरदेव तिला 'झुकेगा नहीं साला' असा डायलॉग मारतो आणि नववधूला हार घालू देत नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यानंतर याच घटनेचा दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये नवरदेव जेव्हा नववधूला हार घालायला जातो, तेव्हा या घटनेचा नववधू चांगलाच बदला घेते. ज्यामुळे नवरदेवाला तिला हार घालनं कठीण होऊन बसलं. यावरुन असे दिसुन येते की नवरदेवाला हा डायलॉग मारणं किती महाग पडलंय. लोकांनी या व्हिडीओला चांगलीच पसंती दर्शवली आहे. अनेक लोक या व्हिडीओजला आपल्या अकाउंटवरुन देखील शेअर करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यामधील पहिला व्हिडीओ  new.flower.decoration या पेजवरून अपलोड करण्यात आला आहे. दुसरा व्हिडिओ _vrindavan_garden नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.