लग्नात नवऱ्याने फेकलेली वरमाला नववधूला नाईलाजाने घालावी लागली, काय आहे प्रकरण? पाहा व्हिडीओ

 या व्हिडीओतील हा नवरदेव नवरीच्या पुढ्यात वरमाला घालण्यासाठी झुकला नाही

Updated: Jul 7, 2021, 06:50 PM IST
लग्नात नवऱ्याने फेकलेली वरमाला नववधूला नाईलाजाने घालावी लागली, काय आहे प्रकरण? पाहा व्हिडीओ title=

मुंबई : प्रत्येक लग्नात काही ना काही मज्जा-मस्करी  सुरु असतेच. नवऱ्याचे मित्र किंवा नवरीकडची मंडळी कोणत्याना कोणत्या मार्गाने एकमेकांचे पाय खेचण्यासाठी काही ना काही मार्गाचा अवलंब करत असतात. लग्नात वरमाला घालताना सुद्धा आपण बहुतेकदा पाहिले आहे की, नवरदेवेचे मित्र किंवा नवरीकडची लोकं समोरच्या व्यक्तीला वरमाला न घालता यावी यासाठी वेगवेगळी युक्ती लावता. काही जण नवरीला उचलून घेतात जेणे करुन नवऱ्याला तिच्या गळ्यात हार घालता येणार नाही. तर काहीं नवरे स्वत:हू नवरीसमोर प्रेमने बसून तिच्याकडून हार घालून घेतात.

परंतु एका लग्नात असं काही घडलं की, जे पाहून तुम्ही तुमचं हसू रोखू शकणार नाही. भारतीयांकडे प्रत्येक भागात त्या त्या ठिकाणचे रिती रिवाज असतात. त्या प्रमाणे त्या ठिकाणच्या लोकांच लग्न ठरते.

लग्नात लोकांच्या वेगवेगळ्या मान्यता देखील असतात. त्यात काही लोकांचे असे म्हणणे आहे की, वरमाला घालताना नवरदेवाने नवरीसमोर झुकु नये. असे केले तर त्याला संपूर्ण आयुष्य बायकोसमोर मान खाली घालून वागण्याची वेळ येईल.

यामुळेच की काय, पण सध्या व्हायरल होत असललेल्या या व्हिडीओतील हा नवरदेव नवरीच्या पुढ्यात वरमाला घालण्यासाठी झुकला नाही आणि नवरीची उंची नवरदेवापर्यंत पोहचत नसल्याने नवरीने लांबूनच वरमाला नवऱ्याच्या गळ्यात फेकली आणि एकदाची रित पूर्ण केली. परंतु नंतर जे काही झालं ते सगळ्यांना हसवणारे आहे.

कारण नवरीने प्रेमाने गळ्यात हार न घातल्यामुळे किंवा नवरीला माझ्यात इंट्रेस्ट नाही असे माणून नवऱ्याने नवरीवर असा काही हार फेकला जे समजण्यासाठी एकदा हा व्हिडीओ पाहाच.

नवऱ्याने ज्यापद्धतीने हार नवरीच्या गळ्यात घातला त्याला लोकं नवऱ्याने नवरीचा घेतलेला बदला आहे असे म्हणत आहेत. नवऱ्याने नवरीचा घेतलेला बदला आणि नवऱ्याच्या स्वॅगला लोकांकडून खूप पसंत केलं जात आहे. यामुळेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर @tweetbyjounralist या अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यावर कॅप्शन लिहिले आहे की,  'यहां तो गंगा उल्टी बह रही है'

या व्हिडीओवर यूझर्स मजेदार कमेंट्स देत आहेत. जो कोणी हा व्हिडीओ पहात आहे, त्याच्या चेहऱ्यावर हा व्हिडीओ पाहून नक्कीच हसू आणत आहे.