मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. सोशल मीडिया हे असं माध्यम आहे, जेथे सर्वांच्याच आवडिचे कंटेन्ट उपलब्ध आहे, ज्यामुळे येथे एकदा का एखादा व्यक्ती आला की, त्याचा तासनतास कसा निघून जातो हे आपल्याला कळत देखील नाही. परंतु सोशल मीडिया हे आपलं मनोरंजनच करत नाही, तर आपल्यासमोर अशी अनेक उदाहरण ठेवतो, ज्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ देखील असाच आहे. हा व्हिडीओ पोलिसांचा आहे. जे ट्राफिकचे सर्वच नियम तोडत आहेत. ज्यामुळे लोकांनी देखील हा व्हिडीओ जोरदार व्हायरल केला आहे.
जर कायद्याचे रक्षण करतेच, कायदा तोडत असतील, तर मग सर्वसामान्यांसाठी वेगळा नियम का असं अनेकांचं म्हणणं आहे.
खरंतर हा व्हायरल होणारा व्हिडीओ पोलिसांचा आहे. जे विनाहेल्मेट दुचाकी चालवत आहेत. एवढंच काय तर, त्या दुचाकीवरती 3 पोलीस प्रवासी बसले आहे. म्हणजेच काय तर हे पोलीस ट्राफीचे दोन्ही नियम तोडत आहेत.
हा व्हिडीओ एका महिला पत्रकाराने काढला आहे. जेव्हा या महिला पत्रकाराची नजर या पोलिसांवर पडली तेव्हा त्यांनी हा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर ती या पोलिसांच्या पुढे जाऊन थांबली, तेव्हा त्या गाडीवरील एक पोलीस कर्मचारी उतरला आणि पुढे चालू लागला.
हे पोलीस कर्मचारी पुढे असे काही आले की जसं काही झालंच नाही. जेव्हा महिला पत्रकाराने पोलिसांना विचारना केली, तेव्हा असं काहीही झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं.
bhutni_ke_memes नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील शिक्षा व्हावी आणि त्याचं देखील चलान कापलं जावं अशी इच्छा व्यक्त करत आहेत.