मैं क्या बोल रहा है, वो क्या बोल रहा है! पठ्ठ्याचं बोलणं ऐकून तुम्हीही पोटधरून हसाल

भाई, जलदी बोल पनवेल निकलना है!

Updated: Sep 30, 2022, 08:07 PM IST
मैं क्या बोल रहा है, वो क्या बोल रहा है! पठ्ठ्याचं बोलणं ऐकून तुम्हीही पोटधरून हसाल title=

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक असतात, तर काही मजेदार व्हिडीओ असतात. अशा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Social Media Viral video) झालेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा अडखळत बोलताना (Person stammering) दिसतोय. त्याचं एक शब्द ऐकून अनेकांना हसू देखील आवरत नाहीये.

अनेकदा असे काही लोग आपल्याला दिसतात, ज्यांना काही शब्द अडखळत बोलण्याची सवय असते. तर बोलताना काही शब्द जड होतात. कठीण शब्द त्यांना सहज बोलता येत नाही. असाच एक प्रकार एका मुलासोबत घडला. या मुलाला महिंद्रा कंपनीची प्रसिद्ध कार असलेली स्कॉर्पियोचे (Scorpio Car) नाव उच्चारणं अवघड जात होतं.

खुप प्रयत्न केल्यानंतर देखील मुलाला स्कॉर्पियो नाव उच्चारता येत नव्हतं. तो नेहमी इस्सस्काररर... पर्यंतच बोलायचा. मात्र, वारंवार उच्चार करण्याचा त्याचा प्रयत्न काही थांबला नाही. व्हिडीओवरून हा मुलगा उत्तर प्रदेश किंवा बिहारचा असल्याचं समजतंय.

पाहा व्हिडीओ- 

 

दरम्यान, या व्हिडीओमध्ये मुलाने लाल रंगाचा शर्ट घातल्याचं दिसतंय. तर त्याचे दोन मित्र देखील व्हिडीओत पहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 14 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक (Video Like) केलं आहे. तर अनेकांनी भन्नाट कमेंट (Video Comments) देखील केल्या आहेत.