Viral Video : छडी लागे छम छमsss, शिक्षिकेला पाहताच विद्यार्थ्यांनी सोपवली छडी अन्...

Emotional Viral Video:  नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Student Teacher Viral Video) समोर आला आहे, ज्यामध्ये काही माजी विद्यार्थी त्याच्या वृद्ध शिक्षकांला भेटताना दिसत आहे.

Updated: Mar 29, 2023, 08:53 PM IST
Viral Video : छडी लागे छम छमsss, शिक्षिकेला पाहताच विद्यार्थ्यांनी सोपवली छडी अन्... title=
Viral Video of Teacher Student

Student Teacher Viral Video: जन्मानंतर मुलांना घडवणाऱ्या तीन प्रमुख संस्था असतात. पहिले आई वडिल, दुसरा म्हणजे समाज किंवा आसपासचे नागरिक आणि तिसरी संस्था म्हणजे शाळा. एका विशिष्ठ वयानंतर मुलांवर संस्कार घडवण्याचं श्रेय जातं ते शिक्षकांना (Teachers). मुलं लहानतून मोठी होत असताना सर्वाधिक काळ शाळेत असतात. त्यामुळे तेथील घटकांचा थेट परिणाम मुलांच्या वागण्यावर दिसून येतो. त्यामुळे शाळा (School) मुलांच्या जडणघडणीत प्रमुख भूमिका बजावते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ (Trending Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Student Teacher Viral Video) समोर आला आहे, ज्यामध्ये काही माजी विद्यार्थी त्याच्या वृद्ध शिक्षकांला भेटताना दिसत आहे. जे पाहून अनेकांना त्यांचे शाळेतील दिवस आणि बालपण आठवलंय. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या शिक्षकांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

आणखी वाचा - घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

काय आहे व्हिडिओ?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये  (Viral Video) काही विद्यार्थी शिक्षिकेच्या घरी गेलेले असतात. सर्व विद्यार्थ्यांनी घरी जाऊन शिक्षिकेची भेट घेतली. ज्यामध्ये एक महिला शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यासमोर छडी घेऊन उभा असल्याचं दिसत आहे. विद्यार्थ्यांनी छडी खाण्यासाठी हात पुढे केला. त्यावेळी शिक्षिकेला विद्यार्थ्यांना छडीला मारण्याचं मन केलं नाही. त्यावेळी विद्यार्थ्यांनी (Old Student Get Emotional) हात पुढे करत मार खाल्लाच.

पाहा VIDEO -

दरम्यान, विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी खूप दिवसांनी आपल्या शिक्षकाला भेटायला आले होते. ज्यामध्ये विद्यार्थी आपल्या शिक्षकांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. एका माजी विद्यार्थ्याने लाडक्या मॅडमला आपल्या सर्व जुन्या सवंगड्यांची ओळख करून दिली. शिक्षिकेने देखील आपुलकीने विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या आणि आशीर्वाद दिले आहेत.