मित्राला झोका देणं तरुणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

हा तरुण डोंगरावर इतक्या उंचावर होता की, तो जर असाच खाली पडला असता तर?

Updated: Jul 8, 2021, 04:09 PM IST
मित्राला झोका देणं तरुणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याच काही व्हिडीओ खूप भावनिक असतात, जे आपल्या न कळत आपल्या डोळ्यांत पाणी आणतात. तर दुसरीकडे, असे काही व्हिडीओ असतात जे आपल्याला हसवून आपल्या डोळ्यात पाणी आणतात. परंतु सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून या तरुणाच्या अवस्थेवर हसावे की, की यातून धडा घ्यावा हे तुम्हीच ठरवा. कारण हा व्हिडीओ एक सेकंदासाठी का होईना, तुमच्या हृदयाचा ठोका चुकवेल.

या व्हिडीओमध्ये,  तुम्ही पाहू शकता की, एक तरुण उंच डोंगरावर झोक्यात बसला आहे. त्याच्याबरोबर आणखी दुसरा तरुण आहे. जो या झोक्यात बसलेल्या तरुणाला मागून धक्का देऊन, डोंगरावर झोका घेण्याचा आनंद लुटण्यासाठी मदत करत आहे.

परंतु मित्राला झोका देणं या तरुणाला भलतंच महागात पडलं आहे कारण, डोंगरावर उंचावरुन मित्राला झोका देत असताना या दुसऱ्या तरुणाचा पाय त्या झोक्यात अडकला आणि तितक्यात झोका पुढे गेल्याने तो तरुण झोक्यासोबत हवेत उडाला. कारण त्याचा पाय या झोक्याच्या दोरीत अडकला होता. त्यानंतर काही सेकंदसाठी हा तरुण हवेतच राहिला.

हा तरुण डोंगरावर इतक्या उंचावर होता की, तो जर असाच खाली पडला असता तर? तर तो जिवंत देखील रहाणे शक्य नव्हते. परंतु त्याचं नशिब इतक चांगलं की, तो त्या झोक्यासोबत पुन्हा पाठी आला खाली जमीनीवर पडला. ज्यामुळे त्याचा जिव वाचवला आहे.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. लोकांनी या व्हिडीओला खूपच पसंती दर्शवली आहे.  लोकं ही व्हिडीओ क्लिप केवळ एकमेकांशीच शेअर करत नाहीत, तर यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एकीकडे या व्हिडीओमधील तरुणाची फजेती पाहून तुम्ही हसाल, परंतु दुसरीकडे हा व्हिडीओ पाहून तुम्ही काही वेळासाठी थक्कं व्हाल. कारण हा तरुण किंवा हा झोका थोडासा जरी इकडे तिकडे झाला असता, तर या तरुणाला आपला जीव गमवावा लागला असता.