जंगलाच्या राजावर दोन सिंहिणींचा हल्ला, पुढे काय घडलं पाहा थरारक व्हिडीओ

आपल्या सगळ्यांना हे माहित आहे की, जंगलाचा राजा हा सिंह आहे. त्यामुळे सगळे प्राणी त्याला घाबरतात.

Updated: Nov 10, 2021, 07:26 PM IST
जंगलाच्या राजावर दोन सिंहिणींचा हल्ला, पुढे काय घडलं पाहा थरारक व्हिडीओ title=

मुंबई : आपल्या सगळ्यांना हे माहित आहे की, जंगलाचा राजा हा सिंह आहे. त्यामुळे सगळे प्राणी त्याला घाबरतात. सिंह हा प्राण्यांना मारून त्यांना आपले भक्ष बनवतो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की सिंहा हा खूप कमी वेळा शिकार करतो. संपूर्ण कुटूंबासाठी आणि सिंहासाठी जेवण आणण्याची जबाबदारी ही सिंहिणीकडे असते. ज्यामुळे सिंहिण प्राण्यांचा शिकार करते आणि ती यामध्ये चपळाई आणि चतुराईने काम करते.

परंतु तुम्ही कधी आजपर्यंत सिंहिणीने सिंहावरती हल्ला केल्याचे पाहिले आहे का? जर तुम्ही असे दृश्य कधी पाहिले नसेल तर हा व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर प्राण्यांचे किंवा वाईल्ड लाईफचे अनेक व्हिडीओ फोटो आपल्याला पाहायला मिळता. अनेक प्राणी प्रेमी अशाच आगळ्या-वेगळ्या क्षणांच्या शोधात असतात आणि ते आपल्या कॅमेरात टीपतात.

असाच एक वेगळा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण यामध्ये दोन सिंहीणी एका बब्बर सिंहावर हल्ला करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की बब्बर सिंहाच्या मागे दोन सिंहीनी तुटून पडल्या आहे. यादरम्यान बब्बर सिंह मात्र त्यांच्या तावडीतून आपली सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सिंहाची वृत्ती पाहून सिंह तिथून पळून जाण्यातच आपलं भलं असल्याचे मानत आहे.

मात्र व्हिडीओ पाहून सिंहीणीचे सिंहाशी आणखी वैर झाल्याचे दिसून येत आहे. ती सतत सिंहावर हल्ला करत असते. मात्र, सिंह कसा तरी तेथून पळून जाण्यात यशस्वी होतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जंगलाचा राजा सिंह यांच्यावरती हल्ला न करताच पळू जातो.

२४ सेकंदांच्या या थरारक लढाईचा व्हिडिओ @Thedarksnature नावाच्या हँडलवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास 1 लाख वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'सिंहाने यांची फसवणूक केली असावी, ज्याची त्याला शिक्षा देण्यात आली आहे.' त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'हे त्याचे कौटुंबिक प्रकरण असू शकते.'  'या दोन सिंहिणींना या सिंहाने फसवले असू शकते' असे देखील एक युजरचे म्हणणे आहे.