सख्खी आई पक्की वैरी; चिमुकल्याला अमानुष मारहाण (व्हिडिओ)

घटनेचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Updated: Aug 19, 2018, 11:50 AM IST

सिरसा: किरकोळ कारणावरून रागे भरलेल्या एका आईने चिमुकल्याला अमानुष माहराण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हडिओ हरियाणातील सिरसा येथील घटनेचा असल्याचे समजते. व्हिडिओतील मुलगा अवघ्या चार वर्षाचा असून, त्याने केवळ बिछान्यावर नैसर्गिक विधी केल्याच्या कारणावरून आईने त्याला अमानुष पद्धतीने मारहाण केल्याची माहिती आहे.

आईचे हृदय द्रावले नाही

एक महिला लहान मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारताना व्हिडिओत दिसते. ही महिला चिमुकल्याची आई आहे. मारामुळे मुलगा कळवळून जीवाच्या अकांताने रडतो आहे. पण, रागाने बेभान झालेल्या आईचे हृदय जराही द्रावताना दिसत नाही. उलट ती त्याचे ओरडणे पाहून तिला अधिकच चेव येताना दिसत आहे. तिच्या या कृत्याबद्धल सोशल मीडियातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

आजीने दिली पोलिसांत तक्रार

दरम्यान,  चिमुकल्याच्या आजीने पोलिसांत तक्रार दिल्यावर ही घटना समोर आली. आजीने चिमुकल्याची आई त्याला मारहाण करतानाचे मोबाईल कॅमेऱ्याने चित्रिकरण केले. या चित्रिकरणाचा व्हिडिओही आजीने पोलिसांना दाखवला. त्यानंतर पोलिसांनी आईविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केल्याचे सिरसा पोलिसांनी म्हटले आहे.