Viral Video : तहानलेल्या माकडाला पाणी पाजल्यानंतर माकडाने कशी मैत्री केली...पाहाच

एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. लोकं त्याला खूप पसंती दाखवत आहेत. 

Updated: Apr 20, 2021, 08:56 PM IST
Viral Video : तहानलेल्या माकडाला पाणी पाजल्यानंतर माकडाने कशी मैत्री केली...पाहाच title=

मुंबई : सध्या सवत्र कोरोना आणि लॉकडाऊनच्याच चर्चा सुरु आहेत. लोकं वाढती रुग्ण संख्या पाहूण घाबरले आहेत. तर काही लोकांना आता या लॅाकडाऊन आणि नीगेटिव्ह बातम्याचा कंटाळा आला आहे. अशातच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. लोकं त्याला खूप पसंती दाखवत आहेत. हा व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आणि संध्याकाळपर्यंत याला 25 हजारपेक्षा जास्त व्यूव्हस मिळाले आहेत.

हा व्हिडीओ पाहूण नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हासू येणार आहे. यामध्ये एक प्रवासी बसला आहे. त्यावेळेस उष्णतेपासून वाचण्यासाठी आणि सावलीच्या शोधात असलेली माकडं त्याच्या बाजूला येऊन बसली.

या सुंदर व्हिडीओमध्ये एक तहानलेला माकड त्या माणसाच्या जवळ येतो, तेव्हा तो माणूस आपल्या जवळ असलेली पाण्याची बाटली उघडलो आणि त्या माकडाला पाणी पाजतो. तो माकड खूप सोजवळ आणि प्रेमळपणे त्या माणसाच्या बाजूला बसून पाणी पीत आहे.

दुसऱ्या तहानलेल्या माकडाने हे पाहिले. त्याने या पहिल्या माकडाला तेथून मागे ढकलले आणि पाण्याची बाटली खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु तो माणूस त्या दुसर्‍या माकडालाही प्रेमळपणे वागणूक देत आहे. हा दुसरा माकड थोडा अतरंगी आहे. त्या माकडाला हा माणूस पाणी पाजत होता, तरी त्याला याची मदत घ्यायची नव्हती. पण अखेर त्याने त्या माणसाची मदत घेतली आणि बाटलीतले पाणी प्यायला.

तो दुसरा माकड पाणी पित असताना पहिला माकड त्या माणसाच्या बाजूला त्याच्या मांडीला टेकून शांत पणे आपल्या पाळीची वाट पाहत उभा आहे. त्यावेळेस त्या माकडाने आपला हात त्या माणसाच्या मांडीवर प्रेमाने ठेवला. दुसऱ्या माकडचं पाणि पिऊन झाल्यानंतर त्या माणसाने बाटली काढून घेतली आणि परत पहिल्या माकडाला त्याची तहान भागवण्यास मदत केली आणि बाटली रिकामी झाली.

हा व्हिडीओ ट्वीटरवर भारतीय वनसेवा अधिकारी (Forest Service Officer) सुनंता नंदा यांनी अपलोड केला आहे. त्यांनी शेअर करताना या व्हिडीओवर लिहिले आहे की, "या जगात जिथे आपण काहीही करु शकते, तेथे दयाळू व्हा".